पंचनाम्याचा फार्स टाळा, शेतकर्‍यांना मदत द्या ः कर्डिले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, October 21, 2020

पंचनाम्याचा फार्स टाळा, शेतकर्‍यांना मदत द्या ः कर्डिले

 पंचनाम्याचा फार्स टाळा, शेतकर्‍यांना मदत द्या ः कर्डिले


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना टाळेबंदीमुळे उद्भवलेले भीषण संकट आणि त्यातच यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले अतोनात नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, अशा गंभीर संकटात शेतकर्‍यांना सरकारने भरीव मदत तातडीने उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने पंचनाम्यांचा फार्स टाळून तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा व सर्व शेतकरी बांधवांना सरसकट तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करुन ती तत्काळ शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करावी, अशी मागणी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली.
अरणगाव, कामरगाव, वडगाव गुप्ता, बुरुडगाव, भोयरे पठार, पिंपळगाव कौडा, नागापूर, बोल्हेगाव येथील शेतकर्‍यांना जिल्हा बँकेच्यावतीने देण्यात येणार्‍या खेळते भांडवलाच्या एकूण 16 कोटी 34 लाख रुपयांच्या धनादेशांचे वाटप माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी कर्डिले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी 15 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करुन जिल्हा बँकांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत. शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या मदतीबरोबरच त्यांच्या मुलांना स्वयंरोजगार, पशुपालन, कुकुटपालन व इतर व्यवसायासाठी देखील अर्थपुरवठा करण्याचा विषय विचाराधीन आहे. यावेळी जि. प. सदस्य माधवराव लामखेडे म्हणाले की, नगर तालुका दुष्काळी तालुका असून यावर्षी अतिवृष्टीमुळे हातचे पीक सुद्धा गेले आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून, शासनाने योग्यवेळी मदत केली तरच शेतकर्‍यांन दलासा मिळू शकेल. माजी मंत्री कर्डिले यांनी जिल्हा बॅकेच्या माध्यमातून नगर तालुक्यातील शेतकर्‍यांना या काळामध्ये मोठी आर्थिक मदत करण्याचे काम केले. त्यांनी कधीही विकास कामांमध्ये पक्षीय राजकारण न आणता सर्वांना बरोबर घेऊन व खेळते भांडवलाच्या रुपाने शेतकर्‍यांना मदत केली, असे ते म्हणाले.यावेळी बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, रेवणनाथ चोभे, शिवाजी कार्ले, संतोष कुलट, सुरेश सुंबे, दिलीप भालसिंग, बाबासाहेब जाधव, विजय शेवाळे, जालिंदर कदम, दत्ता सप्रे, मनोज कोकाटे, पोपट पुंड, आनंदराव शेळके, गंगाधर शिंदे, बापू कुलट, खंडू काळे, नवनाथ वाघ, बाळासाहेब पोटघण, शरद दळवी, वर्षा जाधव, मोहन गहिले, शामराव पिंपळे, जालिंदर डोंगरे, मीनाबाई गव्हाणे, वसंत ठोकळ, कमलाकर पवार, बाबासाहेब भोर, रावसाहेब साठे, गणेश साठे, विमल कातोरे, तुकाराम कातोरे आदी नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here