‘नवी इट्टी, नवा डाव’ उक्तीप्रमाणे तहसील कार्यालयाचे कामकाज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, October 21, 2020

‘नवी इट्टी, नवा डाव’ उक्तीप्रमाणे तहसील कार्यालयाचे कामकाज

 ‘नवी इट्टी, नवा डाव’ उक्तीप्रमाणे तहसील कार्यालयाचे कामकाज


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तहसीलदार कार्यालय आवारात असलेल्या रेकॉर्ड रुममध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरु असून येथील जुन्या कर्मचार्‍यांना काढून टाकत नवीन कर्मचार्‍यांची नियुक्ती केली मात्र अभिलेख कक्षातील नवीन कर्मचार्‍यांना कोणतेही दस्त लवकर सापडत नसल्याने या अनागोंदी कारभाराचा आर्थिक फटका मात्र तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याने बसत असून किरकोळ कामासाठी नागरिकांना अनेकवेळा हेलपाटे मारावे लागत आहेत. तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांना पीक कर्ज मिळण्यासाठी जुने सातबारे तसेच फेरफार याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत असून. त्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात सर्व सामान्य नागरिक तसेच शेतकरी तहसील कार्यालयाच्या आवारातील रेकार्ड रुममध्ये सकाळी लवकर येतात मात्र मागील काही दिवसापासून रेकार्ड रूम बंद ठेवण्यात आले होते. मात्र आरडाओरड झाल्यानंतर मागील 3 दिवसापासून सुरू करण्यात आले मात्र कर्मचार्‍यांना वाटेल त्या वेळेस रेकोर्ड रूम उघडत असल्याने नागरिकांना त्यांना हवे असलेले कागद पत्रे वेळेवर मिळत नाहीत. तसेच सरकारी फीपेक्षा जास्त रकम स्वीकारून देखील हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र श्रीगोंदा तहसील कार्यालयात पहावयास मिळत असून श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांची बदली झाल्यानंतर तहसीलदार पदी प्रदीपकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली मात्र नवी इट्टी, नवा डाव या उक्ती प्रमाणे पवार यांनी अभिलेख कक्षातील जुन्या कर्मचार्‍यांना काढून टाकत नवीन कर्मचार्‍यांची नियुक्ती केली मात्र या नविन कर्मचार्‍यांना तेथील कामाची कोणतीही माहिती नसल्याने नागरिकांचे कोणतेही दस्त लवकर सापडत नसल्याचे याचा आथिर्क फटका कोरोनामुळे तसेच अतिवृष्टीमुळे आथिर्क संकटात सापडलेल्या नागरिकांना तसेच शेतकर्‍यांना बसत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here