‘त्या’ युवा सेनेच्या कार्यकर्त्याचा वंजारी समाजातर्फे निषेध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 21, 2020

‘त्या’ युवा सेनेच्या कार्यकर्त्याचा वंजारी समाजातर्फे निषेध

 ‘त्या’ युवा सेनेच्या कार्यकर्त्याचा वंजारी समाजातर्फे निषेध

शहरातील वंजारी समाजाचे पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांना युवा सेनेच्या एका कार्यकर्त्याने मारण्याची धमकी देऊन वंजारी समाजाला उद्देशून जातीवाचक शब्द वापरल्याबद्दल शहरातील समस्त वंजारी समाजाच्या वतीने निषेध नोंदवून संबंधीत कार्यकर्त्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस अधिक्षक कार्यालयात देण्यात आले. यावेळी  समाजाचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब खांडरे, ज्ञानेश्वर साळवे, सोमनाथ साळवे, ल.बा. साळवे, योगेश वराडे, काशिनाथ रनमळे, मच्छिंद्र साळवे, सागर सातपुते, नीलेश खांडरे, सागर मुर्तडकर, विनायक साळवे, विजय खांडरे, मयूर डापसे, ताराचंद साळवे, रवींद्र डापसे आदि उपस्थित होते.
पाईपलाइन रोड येथे शिवसेनेच्या सभासद नोंदणी अभियान प्रसंगी लहामगे यांच्यावर खुर्च्याची फेकाफेक करण्यात आली. तर युवा सेनेचा कार्यकर्ता रविंद्र वाकळे याने लहामगे यांना शिवीगाळ करीत वंजारी समाजाचा बंदोबस्त करु, अशी धमकी दिली. असे वादग्रस्त वक्तव्य करुन वाकळे याने संपुर्ण वंजारी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. अशा पध्दतीने संपुर्ण समाजाबद्दल चुकीचे वक्तव्य करणार्‍या युवा कार्यकर्त्यावर कारवाई करावी करण्याची मागणी वंजारी समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. वंजारी हा कष्टकरी समाज असून, अशा धमक्यांना भीक घालणार नाही. तर वाकळे यांनी समाजाची माफी मागावी. तर शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी अशा जातीयवादी कार्यकर्त्याला पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी. अन्यथा याचे तीव्र पडसाद राज्यात उमटणार असल्याचे समाजाचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब खांडरे यांनी म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment