अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांचा मरकड परिवारातर्फे सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, October 21, 2020

अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांचा मरकड परिवारातर्फे सत्कार

 अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांचा मरकड परिवारातर्फे सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नवनिर्वाचित अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय राठोड यांचा चैतन्य उद्योग समूह व मरकड परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर राठोड म्हणाले की, ग्रामीण भागात  नगर येथे डीएड करण्यासाठी महाराष्ट्र अध्यापक विद्यालयात आलो तेथे मला शिक्षिका व आईच्या नात्याने प्रा पुष्पा मरकड यांनी मायेचा आधार व जगण्याची शिकवण दिली, त्यामुळे मी आज या पदापर्यत पोहोचू शकलो याचे सर्व श्रेय मी माझ्या शिक्षकांना देतो. डॉ. राठोड हे पाथर्डी तालुक्यातील शिरापूर या छोट्या गावातील रहिवाशी प्राथमिक शिक्षक ग्रामीण भागात येऊन नगर शहरात डीएड ही पदवी घेतली काही वर्षे शिक्षक म्हणून त्यांनी काम केले त्यानंतर आपण शासकीय नोकरी जावे म्हणून त्यांनी स्पर्धा परीक्षेतून यश मिळवत आज ते उपअधीक्षक पदापर्यत पोचले त्यांचे कार्य हे नव्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार किशोर मरकड यांनी व्यक्त केले.
    यावेळी बोलताना प्रा सौ पुष्पा मरकड म्हणाले की, म्हणाल्या की राठोड यांची प्रगती ही आमच्यासारख्या शिक्षकांना अभिमानास्पद आहे विद्यार्थ्याने विद्यार्थी जगात असताना परिपूर्ण शिक्षण घेतले तो जगाच्या पाठीवर कुठेही स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो हे राठोड यांनी दाखवून दिले आहे. शेतकर्‍याचा मुलगा मोठा होताना पाहताना आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो. यावेळी प्रा.भाऊसाहेब लबडे प्रा.सर्जेराव म्हस्के, प्रा. अशोकराव सांगळे नितीन मरकड, ओंकार मरकड आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here