शिवसैनिकांनो एकत्र या, अन्यथा पक्ष नामशेष? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 5, 2020

शिवसैनिकांनो एकत्र या, अन्यथा पक्ष नामशेष?

 शिवसैनिकांनो एकत्र या, अन्यथा पक्ष नामशेष?

शिवसेना ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडेची भावनिक साद...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आम्ही लाठ्याकाठ्या खाऊन स्व.भैय्या राठोड यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरात शिवसेना वाढविली. ती शिवसेना गटबाजीने पोखरली आहे. पक्षात असेच वाद, गट-तट राहिले तर, शिवसेना नामशेष होईल ही भीती शिवसेनेचे जेष्ठ नेते अंबादास पंधाडे यांनी व्यक्त केले आहे.
    श्री पंधाडे म्हणाले की, या गटातटामुळे शिवसेनेचे मोठे संख्याबळ असताना महापौर होऊ शकला नाही. आज प्रत्येकाला नगरसेवक, महापौर व्हावे वाटते. त्याग कोणालाच करावा वाटत नाही. शिवसेनेत गट-तट असताना अनिल भैय्यांना 70 हजार मते मिळाली म्हणजे शिवसेनेची शहरात मोठी ताकत आहे.आज दुसर्‍या पक्षांची ताकद शहरात वाढत असताना शिवसेनेतील गट तट चव्हाट्यावर येत आहेत हे योग्य नाही. दोन गट एकमेकांना पाण्यात पहात आहेत. एकमेकांवर आरोप करीत आहेत. गटबाजी अशी कायम राहिली तर पक्ष नामशेष होईल. अक्षरश: रक्त सांडून कडव्या शिवसैनिकांनी नगर शहरात पक्ष रूजवला. आज पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. अनिलभैयांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर पक्ष पुन्हा त्याच दिमाखात पक्ष उभा केला पाहिजे. गटबाजी अशीच कायम राहिली तर पक्षच नामशेष होण्याचा इशाराही पंधाडे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment