फाउंडेशन व सेवा संस्थेच्यावतीने ‘हाथरस’चा निषेध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 21, 2020

फाउंडेशन व सेवा संस्थेच्यावतीने ‘हाथरस’चा निषेध

 फाउंडेशन व सेवा संस्थेच्यावतीने ‘हाथरस’चा निषेध

महिला सुरक्षिततेसाठी कठोर कायदा व प्रभावी अंमलबजावणी व्हावी : डॉ. सागर बोरुडे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भारत देश हा सुसंस्कृत देश आहे. या देशामध्ये सर्व नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. परंतु अलिकडच्या काळामध्ये महिलांवर व मुलींवर होणार्‍या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे आपली प्रतिमा मलिन होत आहे. यासाठी महिलांवर अत्याचार करणार्‍या नराधामांना कायद्याची धाक बसावी, यासाठी कायद्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. नगरमध्ये कोपर्डीतील बालिकेवर अत्याचार करणार्‍या आरोपींना शिक्षा होऊनही आजतागायत त्यांना फाशी देण्यात आली नाही. त्यामुळे असे नराधाम प्रवृत्तीचे लोक गुन्हे वारंवार करतच आहेत. यासाठी कोपर्डीतील नराधामांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी ह्युमिनीटी केअर फाउंडेशन व मानवता सेवा संस्थेच्यावतीने करण्यात आली. यावेळी हाथरस येथील घटेनचा व या घटनेचा निषेध यावेळी करण्यात आला, ह्युमिनीटी केअर फाउंडेशन व मानवता सेवा संस्थेच्यावतीने हाथरस येथील घटनेचा मेनबत्ती लावून निषेध करताना नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, अ‍ॅड. योगेश गेरंगे, महेश पवार, मच्छिंद्रनाथ म्हस्के, पंकज भांबळ , विनोद जोंधळे, आदित्य कानडे, अनिकेत कोळपकर, नितीन गायकवाड, रंजना उकिर्डे, कांचन इंगवले, साधनाताई बोरुडे, हेमलता कांबळे, श्रुतिका दरेकर आदी उपस्थित होते. डॉ. सागर बोरुडे म्हणाले की, समाजामध्ये महिलांचा सन्मान होणे गरजेचे आहे. देशाच्याजडणघडणीमध्ये महिलांचा वाटा मोठा आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रामध्ये आपल्यावरील जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील आरोपींना फाशीची शिक्षा होऊनही कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे गुन्ह्यांच्या वाढीत वाढ होत आहे. त्यामुळे महिला सुरक्षितेच्या कायद्यामध्ये बदल करुन ते अधिक कठोर करणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment