शिवसेनेच्या सभासद नोंदणीस सुरूवात, नगरमध्ये 50 हजाराचे उद्दिष्ट्य - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, October 19, 2020

शिवसेनेच्या सभासद नोंदणीस सुरूवात, नगरमध्ये 50 हजाराचे उद्दिष्ट्य

शिवसेनेत येणार्‍याची संख्या मोठी ः प्रा. शशिकांत गाडे

शिवसेनेच्या सभासद नोंदणीस सुरूवात, नगरमध्ये 50 हजाराचे उद्दिष्ट्य


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः प्रत्येक कार्यकर्ता हा शिवसेनेचा शिवसैनिक व्हायला हवा युवा वर्ग महत्वाचा कारण त्यांच्या प्रचंड उर्जा,ताकद असते आज प्रत्येकात शिवसेना व स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पोहचविल्यास शिवसैनिक वाढण्यास मदत होईल,शिवसेना ही 80 टक्के समाजसेवा 20 टक्के राजकारण करते त्यामुळे शिवसेनेत येणार्‍याची संख्या प्रचंड आहे.कारण शिवसैनिक कुठेही गेला तरी त्याला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास शिवसैनिक 100 टक्के मदत  करतो असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख प्रा शशिकांत गाडे यांनी केली.

नक्षत्र लॉन येथे शिवसेनेच्या वतीने सदस्य नोंदणीचे अर्ज प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करून सभासद नोदंनीस जिल्हाप्रमुख प्रा शशिकांत गाडे व शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली.यावेळी उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे ,उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव , माजी महापौर भगवान फुलसौदर ,बाळासाहेब बोराटे ,संजय शेडगे ,शाम नळकांडे , दत्ता जाधव,दत्ता कावरे,मदन आढाव ,आकाश कातोरे,योगीराज गाडे ,अनिल बोरुडे ,अमोल येवले ,अनिल शिंदे,रमेश परतानी ,अंबादास शिंदे ,विशाल वालकर , मनिष गुगळे, संग्राम कोतकर , संतोष गेन्नापा,डॉ.श्रीकांत चेमटे आदी उपस्थित होते.
दिलीप सातपुते म्हणाले की, नगर शहरात सभासद नोंदणीचे 50 हजार उददीष्ट असून ते उददीष्ट पूर्ण होईलच यात काहीच शंका नाही शिवसेना रस्त्यावर उतरून काम करत आहे.शिवसेनेच्या कोणत्या कार्यकर्ता पदाधिकारी यांना सभासदांचे हे कार्ड दाखविल्यास त्यांचे कोणतेही काम जे शक्य होणार असल्यास  ते मार्गी लागेल.त्यामुळे सभासद नोंदणी 50 हजारांचा आकडा लवकरच पार पाडेल याकरीता सावेडी,केडगाव, भिंगार,बोल्हेगांव व शहरात सभासद नोंदणी सुरू होईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here