खेळते भांडवल नवे-जुने करण्यासाठी प्रयत्न करणार ः कर्डिले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, October 19, 2020

खेळते भांडवल नवे-जुने करण्यासाठी प्रयत्न करणार ः कर्डिले

 खेळते भांडवल नवे-जुने करण्यासाठी प्रयत्न करणार ः कर्डिले


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः खरीप , रब्बी पिकांचे घेतलेले कर्ज जसे नवे जुने पध्दतीने करता येते तसेच खेळते भांडवल चे दिले जाणारे हि नवे जुने करण्याची व्यवस्था करणार जेणे करुन शेतकर्‍याना कर्ज भरण्यासाठी ओढाताण होणार नाहीत असे  प्रतिपादन मा. आ. शिवाजी कर्डोले यांनी केले निमगाव वाघा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैेकच्या वतीने शेतकर्‍याना खेळते भांडवलाचे चेक वाटप कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते . या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे , खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुरेशराव सुंबे, बाजार समिती उपसभापती संतोष म्हस्के, रेवन नाथ चोभे, दिलीप भालसिंग, संतोष कुलट , शिवाजी कार्ले, बाबासाहेब जाधव, रामदास सोनवणे,  अनिल डोंगरे, नानासाहेब बोरकर, अरूण कापसे, फलके, संजय जपकर, साहेबराव बोडखे,अनिल शेळके, भारत फलके, पोपट ढगे , संतोष फलके , शिवाजी फलके , सखाराम येणारे , अशोक दळवी उपस्थित होते कर्डिले म्हणाले, नगर तालुका हा दुष्काळी तालुका आहे. चालू वर्षी झालेल्या पावसमुळे खरीप पिके हातातून गेले. मुग, बाजरी, कापुस, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांना आधार देण्यासाठी जिल्हा बँकेने हा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here