तहसीलदारांचे आगमन होताच वाळू पंटर सक्रिय ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 13, 2020

तहसीलदारांचे आगमन होताच वाळू पंटर सक्रिय !

 तहसीलदारांचे आगमन होताच वाळू पंटर सक्रिय !

महसूल तसेच पोलिस विभागाने धरली कारवाईची गुळणी

श्रीगोंदा तालुक्याला जिल्ह्यात दोन नंबर पैशाची खान म्हणून ओळखले जाते. श्रीगोंदयात बदलीसाठी लाखो रुपये मोजून अधिकारी श्रीगोंदयात येण्याचा हट्ट धरतात.श्रीगोंदा महसूल विभागाकडून वाळू साठ्यांचे लिलावांना शासनाची स्थगिती आहे. स्थगितीचा सर्वाधिक लाभ वाळू तस्करांना मिळत आहे. भीमा,घोडनदी बरोबरच तालुक्यातील इतर छोट्या नदी, ओढ्यांमधून वाळूची चोरटी वाहतूक होते. याकडे श्रीगोंदा तहसील प्रशासनातील तलाठी, सर्कल, गौण खनिज अधिकारी, तहसीलदार यांच्या दुर्लक्षामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. पोलिसांना बेकायदा विना परवाना,ओव्हर लोड वाळूच्या मालमोटारीचे चालक, मालक यांच्या विरुद्ध कारवाई करत असल्याचे दिसून येत आहे मात्र महसूल प्रशासन दुर्लक्ष तर करत नाही ना? आणि याबाबत कोणीच काही बोलत नाही. पोलिसही त्यांच्या गस्त घालण्याच्या कालावधीत मिळून आलेल्या एखादी दुसरी गाडी पकडून कारवाई करतात.

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदाः
श्रीगोंदा तालुक्यातील भीमा, घोड नदी व तालुक्यातील छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांतील पात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूचा उपसा करून चोरटी वाहतूक होत आहे. सवयीप्रमाणे तहसील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सरकारचा हजारो रुपयांचा महसूल (स्वामित्वधन) बुडत आहे. केवळ पोलिस गस्तीमध्ये मिळून आलेल्या एखाद दुसर्‍या मालमोटारीवर कारवाई होताना दिसून येत असताना असून महसूल यंत्रणेने कारवाई बाबत गुळणी धरलेली दिसून येते.
श्रीगोंदा तालुक्यामध्ये भिमा व घोड नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग कमी होताच बेकायदा वाळू उपशाला उधाण आले आहे. रात्री-अपरात्री भिमा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असून वाळू तस्करांचा नदीपात्रावर राबता सुरू झाला आहे. महसूल व पोलीस यंत्रणेवर नजर ठेवण्यासाठी वाळू तस्करांचे पगारी पंटर सक्रीय झाले असून त्यांची तालुक्यातील मुख्य रस्ते, पोलीस ठाण्याचे आवार, तहसीलदार यांच्या गाडीवर पाळत ठेवणे. धोकादायक ठिकाणाहून गाडी पास करून देणे हे नित्याचेच उद्योग सुरू झाले आहेत. विशेषतः रात्री व पहाटे वाळूच्या गाड्या भरून तालुक्याबाहेर आडमार्गाने इच्छित स्थळी पोहोच केल्या जातात. कुणी हटकले तर हे पंटर मोठ्या पुढार्‍यांची नावे सांगून दमदाटी करतात. ही बेकायदा वाळू तस्करी बंद करण्याची मागणी पर्यावरणी प्रेमी वर्षानुवर्षे करत आहे पण कोट्यवधी रुपयांची उलाढाल असल्याने व सरकारी लोकांनी हप्ते ठरवून घेतल्याने सर्वसामान्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जाते. गेल्या काही वर्षांपासून या भिमा तसेच घोड नदीपात्रातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्याचा गोरखधंदा जोमात सुरू आहे. असून वाळू उपसा करण्यासाठी आधुनिक वाहनांचा व यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. श्रीगोंदा तालुक्यातील वाळूला अहमदनगर,पुणे, मुंबई, येथून मोठी मागणी वाढली असून वाळूला सोन्याचे मोल आले आहे. त्यासाठी जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर वाळूचा पुरवठा करणार्या एजंटांची साखळी कार्यान्वित झाल्याचे बोलले जात आहे. 

No comments:

Post a Comment