नागरिकांच्या सहकार्याने कोविडविरुद्धची लढाई जिंकू ः द्विवेदी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 13, 2020

नागरिकांच्या सहकार्याने कोविडविरुद्धची लढाई जिंकू ः द्विवेदी

 नागरिकांच्या सहकार्याने कोविडविरुद्धची लढाई जिंकू ः द्विवेदी

के.एस.बी. केअर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने जिल्हा रुग्णालयास अ‍ॅब्युलन्स व 20 मॉनिटर सुपूर्द


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सध्या कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावावर जिल्हा प्रशासनाच्यावतीने चांगले काम करुन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा रुग्णांलयाच्यावतीने कोरोना बाधित रुग्णांना अत्याधुनिक सेवा उपलब्ध करुन दिल्याने  अनेक रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. कोरोनाच्या या संकटात जिल्हा प्रशासनास अनेकांनी सहकार्य केल्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येत असून, त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करणे सुलभ होईल. आज के.एस.बी. कंपनीच्यावतीने देण्यात आलेल्या अ‍ॅब्युलन्स व मॉनिटरमुळे रुग्णांवर उपचार करण्यास सोपे होणार आहे. अशा उपक्रमांमधूनच नागरिकांच्या सहकार्याने कोव्हिड विरुद्धची लढाई आपण जिंकू असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केला.
के.एस.बी. केअर चॅरिटेबल ट्रस्ट व के.एस.बी. लि.वांबोरी यांच्यावतीने जिल्हा रुग्णालयास एक अ‍ॅब्युलन्स व 20 मॉनिटर देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा शल्य चिकित्सक सुनिल पोखरणा, एच.आर.मॅनेजर रावसाहेब सोर, प्लॅट हेड भगवान बागल, डिजीएम एचआर किरण शुक्ल, क्वॉलिटी मॅनेजर शिरिष गायकवाड, परचेस मॅनेजर संदिप देशमुख, पोलिस उपाधिक्षक विशाल ढुमे, वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष कोकरे, विजय ढाकणे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.दादासाहेब साळूंके, मनपा उपायुक्त प्रदीप पठारे आदि उपस्थित होते.
यावेळी के.एस.बी.चे रावसाहेब सोर म्हणाले की, कंपनीच्यावतीने नेहमीच सामाजिक दायित्व जपले आहे. वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा रुग्णांलयाच्यावतीने चांगली सेवा रुग्णांना दिली आहे. या रुग्णसेवेत कंपनी सहभागी होऊन खारीचा वाटा उचलला आहे. ट्रस्टच्यावतीने सुमारे 14 लाख रुपये किंमतीची अत्याधुनिक अ‍ॅब्युलन्स, सुमारे साडे नऊ लाख रुपयांचे 20 मल्टीफंक्शन पेशंट मॅनिटर आदि जिल्हा रुग्णांलयाकडे सुपूर्द केले आहेत. यामुळे रुग्णांची मोठी सोय यामुळे होणार आहे.  कंपनीच्यावतीने सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचार्यांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे. कंपनीच्यावतीने कोरोना काळातही राहुरी तालुक्यासह विविध ठिकाणी मदत दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक सुनिल पोखरणा म्हणाले, जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे रुग्ण लवकर बरे होण्याचे प्रमाणाही वाढले आहे. त्याचबरोबर कोरोना व्यतिरिक्त रुग्णांचीही काळजी घेण्यात येत आहे. प्रशासनाची सर्व टिम चांगले काम करत आहे. कंपनीने दिलेल्या अ‍ॅब्युलन्समुळे रुग्णांची ने-आण करण्यास चांगली व्यवस्था होईल. त्याचबरोबर आधुनिक मॅनिटरमुळे रुग्णांवर उपचार करण्यास चांगला उपयोग होईल.
याप्रसंगी डॉ.संदिप सांगळे, डॉ.संजीवन बेळंबे, डॉ.दर्शना बारवकर, डॉ.राहुल शिंदे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment