कोरोनाचा वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेमध्ये समावेश करण्याची ग्रामसेवकांची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 1, 2020

कोरोनाचा वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेमध्ये समावेश करण्याची ग्रामसेवकांची मागणी

 कोरोनाचा वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेमध्ये समावेश करण्याची ग्रामसेवकांची मागणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना 27 गंभीर आजारांवरील उपचारासाठी असलेल्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेमध्ये कोव्हीड-19 (कोरोना) आजाराचा तातडीने समावेश करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे राज्याध्यक्ष विजय म्हस्कर, सरचिटणीस के आर किरुळकर, राज्य सचिव अनिल जगताप यांनी  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना  आपत्तीमध्ये पहिल्या दिवसापासुन  गावपातळीवर कर्तव्य बजावणारे ग्रामसेवक संवर्गांमधुन राज्यातील अनेक ग्रामसेवकांना कोरोनाची  बाधा  झाली असुन  दुर्देवाने  काही ग्रामसेवक मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडत आहेत ही बाब अतिशय गंभीर आहे.
कोरोनाबाधीत ग्रामसेवक संवर्गास तातडीने बेड मिळणे व तात्काळ वैद्यकीय उपचार मिळण्यास अडचणी येत असून, वैद्यकीय उपचारांचा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. या सर्व बाबींचा विचार करुन ही मागणी करण्यात आली.
राज्यातील ग्रामसेवक जीवाची पर्वा न करता गावपातळीवर कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाबाधित ग्रामसेवक संवर्गांसाठी जिल्हा व तालुका स्तरावरील कोव्हीड सेंटरमध्ये  व्हेंटिलेटर, बेड राखीव ठेवावेत व वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेमध्ये कोरोना आजाराचा तात्काळ  समावेश करावा , या मागणीची  शासनाने तातडीने दखल घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्यावतीने प्रसिद्धपत्रकाद्वारे करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment