वाघ्या मुरळींना विशेष निधी उपलब्ध करावा : गायकवाड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 1, 2020

वाघ्या मुरळींना विशेष निधी उपलब्ध करावा : गायकवाड

 वाघ्या मुरळींना विशेष निधी उपलब्ध करावा : गायकवाड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य पारनेर शाखेच्या वतीने विविध मागण्यासंदर्भात आपले लेखी निवेदन पारनेर शाखेच्या तालुका अध्यक्ष श्रीमती दिपाली गायकवाड यांनी पारनेरचे नायब तहसिलदार अविनाश रणदिवे यांना दिले.
वाघ्या मुरळी लोककलावंत अनादिकालापासुन धर्मजागरण कुलधर्म कुळाचार पालन व समाजप्रबोधन याद्वारे समाजसेवेच  काम करत आहोत . समाजातील भाविक भक्ताच्या आश्रयावर आमचा कुुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो मार्च 2020पासुन कोरोना आजाराच्या साथीने सगळी आर्थिक घडी बंद पडली आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तरी
वाघ्या मुरळी कलावंताना उदरनिर्वाह साठी विशेष निधी अनुदान स्वरुपात मंजुर करावा.
वाघ्या-मुरळी लोक कलेस शासनदरबारी अधिकृत मान्यता मिळुन नोंदणी करण्यात यावी. मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्चासाठी शासनाने विशेष शिष्यवृत्ती द्यावी वाघ्या मुरळी कलावंताना जागेसह घरकुल योजना मिळावी , वृध्द कलावंताना पेन्शन योजना सुरू करावी . महाराष्ट्रातील लोककलावंतासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापण करण्यात यावे नियमाच पालन करून कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी . मंदिरे खुली करावीत आशा मागण्या या वेळी करण्यात आल्या . या निवेदनाच्या प्रति पारनेरचे आमदार निलेश लंके सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुख्यमंत्री उद्घव ठाकरे याना ही पाठविण्यात आल्या आहेत .
यावेळी तालुका अध्यक्ष श्रीमती दिपाली गायकवाड कार्याध्यक्ष लोकशाहीर दत्ता जाधव सचिव शांताराम शिंदे सरचिटणीस सागर साळुंके प्रसिद्धी प्रमुख नाना गाडेकर निमंत्रक  दत्ता शिंदे समन्वयक पुनम मिसाळ सुभाष शिंदे शिरूर तालुक्याचे कार्याध्यक्ष सागर उमाप कैलास भोसले सचिव पिया सातपुते निखिल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment