‘त्या’ नराधमांना फाशी दिल्यास अशा घटनांना आळा बसेल! - अण्णा हजारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 1, 2020

‘त्या’ नराधमांना फाशी दिल्यास अशा घटनांना आळा बसेल! - अण्णा हजारे

 ‘त्या’ नराधमांना फाशी दिल्यास अशा घटनांना आळा बसेल! - अण्णा हजारे  


राळेगणसिद्धी :
उत्तर प्रदेशमधील हाथरस गावामध्ये एका मुलीवर काही नराधमांनी दुष्कृत्य केले आहे ही बाब मानवतेला कलंक फासणारी असून या नराधमांना फाशीची शिक्षा दिल्यास अशा घटनांना आळा बसेल असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.
प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात हजारे यांनी म्हटले आहे की, ही घटना म्हणजे केवळ मुलीची नाही तर मानवतेचे हत्या आहे. भारत  ऋषीमुनींचा देश म्हणून ओळखला ओळखला जातो. भारताची संस्कृती ही जगात श्रेष्ठ आहे आणि अशा देशात होणारे दुष्कृत्य हे मान खाली झुकवायला लावणारी आहे असेही हजारे यांनी म्हटले आहे. ही घटना म्हणजेच चिंताजनक बाब असून कायदा व सुव्यवस्था सांभाळणारेच कमी पडत असल्याची खंत व्यक्त करीत अशा नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी हजारे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment