दिव्यांगांना परिवहन विभागात रोजगार उपलब्ध करुन द्यावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 1, 2020

दिव्यांगांना परिवहन विभागात रोजगार उपलब्ध करुन द्यावा

 दिव्यांगांना परिवहन विभागात रोजगार उपलब्ध करुन द्यावा

प्रहार अपंग क्रांती आंदोलनाची परिवाहन मंत्र्यांकडे मागणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः दिव्यांगांना परिवहन विभागात रोजगार विषयक संधी उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरुन दिव्यांग व्यक्ती आपला उदरनिर्वाह करु शकेल, अशा मागणीचे निवेदन ना.बच्चू कडू प्रणित प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्यावतीने  जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.लक्ष्मण पोकळे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना पाठविण्यात आले आहे.

परिवाहन मंत्री ना.अनिल परब यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांगांना रोजगार विषयक संधी राज्य परिवहन महामंडळात उपलब्ध करुन द्यावी. यापूर्वीही महामंडळामध्ये आगारामध्ये व्यवसायिक जागा उपलब्ध करुन दिलेल्या आहेतच. पण आपल्या आगाराच्या चौकशी विभागामध्ये रोजगार मिळाला तर दिव्यांगांना रोजगाराचे साधन उपलब्ध होऊन त्यांचे आर्थिकदृष्ट्या पुर्नवसन होईल. कारण आपल्या चौकशी विभागामध्ये धावपळीचे काम नसते. त्यामुळे हा विभाग दिव्यांग व्यक्त व्यवस्थीत हाताळू शकेल. चौकशी विभागामध्ये अनाऊसिंग करणे, येणार्‍या जाणार्या गाड्यांचे नोंद करणे, प्रवाशांना गाड्या सुटण्याची माहिती देणे व त्यांचा प्रवास सोयीस्कर व्हावा याकरीता प्रयत्न करणे हे सर्व काम बसल्या ठिकाणचे असल्याने दिव्यांगांना सुलभ रोजगार मिळेल व ते व्यवस्थीतरित्या काम पार पाडू शकेल. राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकामध्ये व त्यांच्या उपविभागामध्ये कोठेही चौकशी ऑफिसमध्ये दिव्यांग व्यक्ती दिसत नाही. तेथे फक्त सुदृढ व्यक्तीच कार्यरत आहेत ही खेदाची बाब आहे. म्हणून सुदृढ व्यक्तीला आपल्या दुसर्‍या विभागात कार्यरत करुन तेथे दिव्यांगांना प्राधान्य द्यावे, जेणे करुन दिव्यांग व्यक्ती आपला उदरनिर्वाह करु शकेल. मंत्री महोदयांनी याचा सहानुभुतीपूर्वक विचार करुन राज्यातील सर्व दिव्यांगांना दिलासा द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment