मनोज पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 1, 2020

मनोज पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.

 मनोज पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.

नव्या टिमसह कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सोलापूर येथे कार्यरत असणारे मनोज पाटील यांनी आज अहमदनगर मध्ये येवून पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.
मनोज पाटील हे आज अहमदनगर मध्ये आले असता पोलिस प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत अपर पोलीस अधीक्षक  सागर पाटील तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, मुख्यालयाचे दशरथ हटकर आदी उपस्थित होते. शहरातील पोलिस दलाच्या वसंत कीर्ती  शासकीय विश्रामगृहावर त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना आता नव्या टीम बरोबर काम करावे लागणार आहे कारण नगर जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील यांची पुणे शहरात पोलिस उपायुक्त पदी  बदली झाली असून त्यांच्या जागी नांदेड येथून दत्ताराम राठोड हे नगरच्या अप्पर पोलिस अधीक्षक पदी बदलून आले आहे. जिल्ह्यातील पोलिस उपअधीक्षक संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेशही गृह विभागाने जारी केले आहेत. नगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांची बदली झाली आहे. त्यांना नवीन पदस्थापना प्रतिक्षेत आहे. मिटके यांच्या जागी नगर शहर पोलिस उपअधीक्षक म्हणुन गडचिरोली येथून विशाल ढुमे यांची बदली झाली आहे. कर्जत पोलिस उपअधीक्षक पदी पुणे ग्रामीण येथून अण्णासाहेब जाधव बदलून आले आहेत. तर कर्जतचे पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांची जिल्ह्यातच शिर्डी उपविभागात बदली झाली आहे. शेवगावचे पोलिस उपअधीक्षक मंदार जावळे यांची पुणे जिल्ह्यातील जुन्नर उपविभागात बदली झाली आहे.त्यांच्या जागी शेवगाव उपविभागात लातुर येथून सचिन सांगळे बदलून आले आहेत. शिर्डीचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांची बदली नंतरची पदस्थापना प्रतिक्षेत आहे. नगर जिल्ह्यातील वाढलेली गुन्हेगारी, रोखण्याबरोबर नवीन बदली झालेल्या अधिकार्‍यांना बरोबर घेऊन जिल्ह्याची कायदा व्यवस्था सुधारण्याचे आव्हान मनोज पाटलां पुढे आहे. त्यात ते किती यशस्वी होतील हे काही दिवसातच दिसून येणार आहे.

No comments:

Post a Comment