मागण्या मान्य होईपर्यंत ऊसतोड कामगार घर सोडणार नाहीत ः आ. धस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 1, 2020

मागण्या मान्य होईपर्यंत ऊसतोड कामगार घर सोडणार नाहीत ः आ. धस

 मागण्या मान्य होईपर्यंत ऊसतोड कामगार घर सोडणार नाहीत ः आ. धस


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः कोरोनासारख्या महामारीच्या काळातदेखील सरकार कारखानदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी कारखाने सुरू करून ऊसतोड मजुरांच्या जीवाशी खेळत आहे. जोपर्यत सुरक्षेतेची हमी सरकार घेत नाही आणि ऊसतोड मजूर मुकादम वाहतूकदारांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत कोणीही गाव सोडणार नाही, असा इशारा माजी मंत्री, आमदार सुरेश धस यांनी केले,
ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर आ. धस राज्यभर दौरे करत आहेत. राज्यातील ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार यांच्या संपाची पुढील दिशा ठरवण्यासाठी साल्हेर (तालुका बागलाण जि. नाशिक) येथे ऊसतोड मजुरांचा संयुक्त मेळावा पार पडला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना धस बोलत होते.
यावेळी आमदार दिलीप बोरसे, ऊसतोड कामगार संघटनेचे सचिव सुकदेव सानप, सचिन सुरेश नवले, महेंद्र गरजे, गनेश भोसले, गणेश सानप, उपस्थित होते.  बैरागी यांनी मुकादमांना येणार्‍या अडचणी मांडल्या.

No comments:

Post a Comment