राजकारणापासून बाजूला गेलेलो नाही ः औटी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 8, 2020

राजकारणापासून बाजूला गेलेलो नाही ः औटी

 राजकारणापासून बाजूला गेलेलो नाही ः औटी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता बाळगावी म्हणून काही काळ शांत होतो. आपण राजकारणापासून बाजूला गेलो असा कुणाचा समज असेल तर तो चुकीचा असल्याचे सांगत सक्रिय राजकारणाच राहणार असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी केले.

पारनेर येथे शिवसेनेच्या सभासद नोंदणीस सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. सेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे सभापती काशिनाथ दाते, जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, डॉ.वर्षा पुजारी, डॉ. श्रीकांत पठारे, नितीन शेळके, विजय डोळ, नीलेश खोडदे,शिरीष साळवे, भरत औटी यावेळी उपस्थित होते.

आ. औटी म्हणाले, आपला पराभव झाला याचा अर्थ आपण राजकारणातून बाहेर गेलो असे कोणी समजू नये. राजकारणात कोण कोठे जातात, येतात? यावर आपण बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगत त्यांनी पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना चिमटा काढला. कार्यकर्त्यांनी सुरक्षितता बाळगत गावोगावी शिवसेनेची सभासद नोंदणी करण्याचे आव्हानही मा.आ. औटी यांनी केले. प्रा. शशिकांत गाडे म्हणाले, विजयराव औटी हे पक्षात ज्येष्ठ आहेत. त्यांचा शब्द प्रमाण आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या पुढील काळात पारनेर तालुक्यात शिवसेना आणखी ताकदीने उभी राहील असा विश्वासही प्रा. गाडे यांनी व्यक्त केला.
No comments:

Post a Comment