शहरातील मैदाने खुली करावीत ः संभाजी कदम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, October 20, 2020

शहरातील मैदाने खुली करावीत ः संभाजी कदम

 शहरातील मैदाने खुली करावीत ः संभाजी कदम


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील वाडियापार्क सह इतर मैदाने नागरिकांना फिरण्यासाठी सुरु करण्यात यावी अशी मागणी शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
क्रिडा अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यासह देशात कोरोना महामारीमुळे मागील अनेक महिन्या पासून बंद असलेली क्रीडागणे वाडियापार्क व इतर मैदाने नागरिकांना फिरण्यासाठी सुरु केली तर नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. अनेक दिवसापासून मैदाने बंद असलेने नागरिकांना मोकळा श्वास घेता येत नाही. अनेक नागरिकांना सकाळी-  संध्याकाळी फिरण्याची सवय लागलेली असताना अचानकपणे सर्व बंद असल्याने नागरिकांना फिरता येत नाही. परिणामी त्याच्या आरोग्यवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शहरातील सर्व मैदाने उघडे ठेवण्याची गरज आहे.
सर्व क्रीडागणे मैदाने बंद असल्याने नागरिक रस्त्याने पहाटे किंवा रात्री फिरत असतात त्यामुळे नागरिकांना रस्त्याने ये-जा करणारे मोठ्या वाहनांचा अपघात होण्याचा धोका असतो. शहरातील मैदाने उघडल्यास नागरिक रस्त्यावर फिरणार नाहीत. आता सर्वत्र हळूहळू सर्व कामकाज सुरळीत सुरु झाल्याने हि मैदाने हि सुरू करण्यात यावी असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here