साईसूर्य नेत्रसेवा तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, October 22, 2020

साईसूर्य नेत्रसेवा तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन

 साईसूर्य नेत्रसेवा तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः साईसूर्य नेत्रसेवा या संस्थेतर्फे अत्याधुनिक मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन शनिवार दि. 24 आक्टोबर 2020 सकाळी 10 ते 1 या वेळेत साई सूर्य नेत्रसेवा माणिक चौक अहमदनगर येथे करण्यात आले आहे. हया शिबीरात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया, कृत्रीम भिंगरोपण, तिरळेपणा, टिक पडणे, नेत्ररोपण त्याचप्रमाणे चष्म्याचा नंबर घालविण्याच्या कॉन्टयूरा या अत्याधुनीक लेसर किरणांचे नेत्रउपचार अतिशय सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत.
डोळ्यांच्या विविध आजारांसाठी आयोजित हया शिबीरामध्ये आंतरराष्ट्रीय किर्तीचे नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया शस्त्रक्रिया करणार आहेत. त्याचप्रमाणे डॉ. सौ. सुधा कांकरिया, डॉ. अनिल सिंग, डॉ चिन्मय ब्रह्मे यांचाही सहभाग असणार आहे. याचाही फायदा जनतेला होईल असे साई सूर्य नेत्रसेवाचे व्यवस्थापक श्री रामदास केदार यांनी सांगीतले. या शिबीरासाठी महावीर इंटरनॅशनल, मराठवाडा मित्र मंडळ व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर यांचेही सहकार्य लाभले आहे. तरीही नावनोंदणी साईसूर्य नेत्रसेवा मो 8888982222 यांच्याकडे करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here