नुकसानीचे भेदभाव न करता पंचनामे करा अन्यथा रस्त्यावर उतरु:दत्तात्रय शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 24, 2020

नुकसानीचे भेदभाव न करता पंचनामे करा अन्यथा रस्त्यावर उतरु:दत्तात्रय शिंदे

 नुकसानीचे भेदभाव न करता पंचनामे करा अन्यथा रस्त्यावर उतरु:दत्तात्रय शिंदे

नगरी दवंडी/प्रतिनिधी

माका ः राज्यभर या अगोदर शेतकरी हिताबाबत दुध दरवाढीसाठी,शेतमालांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष संस्थापक माजी मंत्री महादेवजी जाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलनं झाली.अतिवृष्टीमुळे सर्वत्र शेतमालांचे नुकसान झाले.नुकसानीचे पिक पहाणी योग्य पद्धतीने करून दिवाळीच्या अगोदर शेतकरयांच्या बॅंक खात्यातच थेट मदतीची रक्कम सरकारने जमा करून दिवाळी गोड करावी.याबाबत भेदभाव न करता खोटे पंचनामे करू नये,आढळुन आल्यास रस्त्यावर सुद्धा उतरणार असल्याचा सज्जडृ इशारा नेवासे तालुक्यातील रासपचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी दिला आहे.  

आजरोजी कोरोना तसेच अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक बाबतीत संकटात सापडला असता, त्यास सावरण्याची गरज आहे.शासकीय अधिकारयांनी पिक पहाणी करताना भेदभाव न करता योग्यच रितीने शासकीय धोरणानुसार पंचनामे करावेत.ज्या शेतकरयांची पिके आहेत त्यांनाच धरसोड न होता लाभ मिळावा.कुठल्याच बाबतीत खोटे पंचनामे करु नये,  याबाबत आढळून आल्यास सहन केले जाणार नाही.  संबधित शेतकरी वर्गाने घाबरून जाऊ नये,पक्ष सतत तुमच्या पाठीशी उभा आहे.पुन्हा ठिकठिकाणी पक्षाच्या आदेशानुसार तसेच मार्गदर्शनाखाली रस्त्यावर उतरून धरणे आंदोलनं सुद्धा करण्यात येतील.शेतकरयांवरती आसमानी संकट ओढावुन आले असता,कोरोना संकटात सर्वांना धिर देणारंया शेतकरी वर्गाने घाबरून न जाता  पंचनामेवेळी संबधित शासकीय अधिकारयांना सहकार्य करावे.आपली दिवाळी नक्कीच गोड होईल.अशी आशा आहे.याप्रसंगी पक्षाचे जिल्हा संघटक संभाजी लोंढें,  शिवाजी सुपनर,संतोष जाधव,युवकअध्यक्ष सचिन देवकाते, विशाल माकोणे,तालुका संघटक मदन महाराज सोनवणे,शहाजी पठारे,तसेच पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा करताना शिंदे यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment