कर्जतकरांची मानसिकता बदलण्याची गरज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 6, 2020

कर्जतकरांची मानसिकता बदलण्याची गरज

 कर्जतकरांची मानसिकता बदलण्याची गरज



नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः
कर्जत नगर पंचायतने स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान 2021 मध्ये भाग घेतला असून यासाठी कर्जत शहरातील नागरिकांची मानसिकता बदलण्याचे मोठे काम सर्वात प्रथम करावे लागणार असून यासाठी पक्ष विरहित व सर्व समावेशक प्रयत्नाची गरज आहे.
कर्जत शहर म्हणून यात राहणार्‍या प्रत्येक नागरिकांनी स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान 2021 हे सर्व समजून घेण्याची गरज असून सर्वात प्रथम माझे शहर स्वच्छ झाले पाहिजे व सतत स्वच्छ राहिले पाहिजे  ही खूण गाठ बांधली पाहिजे, शहराचा विचार करता यापूर्वीच्या व्यवस्थानी कर्जत शहरात उघड्या गटारी केल्या नाहीत हे अत्यंत महत्वाचे आहे पण आता शहर वासीयांची जबाबदारी आहे की यामध्ये प्रत्येकाने सहभागी होऊन आपले घर व आपला परिसर स्वच्छ कसा राहील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे व यासाठी क्लिन कर्जत ही मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे.
आज शहरात जो रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी कचरा तो तो कोणत्या तरी घरातून येतो अथवा कोणत्या तरी दुकानातून येतो अथवा कोणत्यातरी व्यक्ती ने बाहेरच्या बाहेर टाकलेला असता आपल्या शहरातील शंभर टक्के सर्वानी क्लिन कर्जत अभियान समजून घेतले व त्या अनुषंगाने स्वतः कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकलाच नाही तर नक्कीच हे अभियान यशस्वी झाल्या शिवाय राहणार नाही, या अभियानाचे अनेक फायदे असून जो पर्यंत एखादा कागद, प्लास्टिक पिशवी, वा इतर आपल्या हातात आहे तो पर्यंत ते आपल्याला कचरा वाटत नाही मात्र तेच आपण एखाद्या ठिकाणी टाकले की ते घाण वाटायला लागते तो कचरा वाटू लागतो त्यामुळे आपल्याला कचरा निर्माण होणार नाही या मोहिमेत सहभागी व्हायचे असुन यासाठी कर्जत नगर पंचायत सध्या जोरदार तयारी करते आहे त्याला साथ द्यायची आहे.
स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान 2021 मध्ये नगर पंचायत मध्ये भाजपाची सत्ता आहे म्हणून विरोधकांनी त्यात भागच घ्यायचा नाही असे न करता हे माझ्या कर्जत शहराला स्वच्छ करण्याचे अभियान आहे असे समजून त्यात सर्वानी सहभागी व्हावे, व नगर पंचायतीच्या प्रशासन व पदाधिकारी यांनीही सर्वाना बरोबर घेऊन विश्वासात घेऊन पुढे जावे अशी अपेक्षा असून सध्या तरी काही प्रमाणात यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पहावयास मिळत असले तरी त्यात अधिक व्यापकता आल्यास नक्कीच या अभियानात अपेक्षित यश मिळाल्या शिवाय राहणार नाही. यासाठी मात्र संपूर्ण शहराची एकत्रीत साथ हवी मात्र काही लोकांची मानसिकता बद्दलण्याची गरज असून यासाठी विशेष प्रयत्न केला जाईल का?


No comments:

Post a Comment