केंद्राचा “कृषी कायदा” ही डॉ. बाळासाहेब विखेंची स्वप्नपूर्ती! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 13, 2020

केंद्राचा “कृषी कायदा” ही डॉ. बाळासाहेब विखेंची स्वप्नपूर्ती!

 केंद्राचा “कृषी कायदा” ही डॉ. बाळासाहेब विखेंची स्वप्नपूर्ती!


अहमदनगर (नगरी दवंडी/प्रिंतनिधी) ः
बाळासाहेब विखे पाटलांनी शेतीला कौशल्य लागते. कुठलाही सुशिक्षित माणूस कौशल्य नसेल तर शेती करू शकत नाही अशा स्थीतीत शेतीला आपण ‘एंटरप्राइज’ का म्हणत नाही? असा मार्मिक सवाल केला होता. याला केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांद्वारे समर्पक उत्तर मिळाले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

“विखे-परिवारांशी आमचं जुनं नातं आहे. ते मातोश्रीवर यायचे. या घराण्याबद्दल प्रेम आणि आपुलकी आहे. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी चर्चा करायचे. कोंडला गेलेला हा हिरा शिवसेनाप्रमुखांनी कोंदणात बसवला,’ मूर्ती छोटी पण व्यक्तिमत्व मोठं हे अभावानेच दिसतं. बाळासाहेब विखेंचं व्यक्तिमत्त्व मोठं होतं. त्यांनी जी काही गरीबी पाहिली, ती कधी विसरली नाही. त्यांनी गरीबांची दु:खं दूर करण्याचं काम केलं आहे”
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

’बाळासाहेब विखे पाटील लिखित “देह वेचावा कारणी या”  हे आत्मचरित्र नाही तर राजकारण, मानवी जीवन मूल्य, शेती आणि सिंचनाचं शिक्षण देणारा हा ग्रंथ आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाचलाच पाहिजे.  देशात अनेक लोक खासदार होतात, काम करतात. काही काळानंतर तो प्रत्येक व्यक्ती खासदार माजी होतो. पण बाळासाहेब विखे-पाटील हे आजन्म खासदार राहिले. आजही त्यांचा उल्लेख खासदार असाच होतो  जन्मापासूनची कहानी या चरित्रात आहे. त्यांनी कधी गरिबीचा विसर कधी पडू दिला नाही. जन्मभर भेदभावरहित काम करण्याचं काम त्यांनी केलं. शेती आणि पाणी साठवणुकीत वेगवेगळे त्यांनी प्रयोग केलं. सिंचनातून त्यांनी दुष्काळमुक्तीचा प्रयोग त्यांनी सुरु केला.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते वर्च्युअल कार्यक्रमात झाले त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व अन्य लोकप्रतिनिधी लोणी प्रवरा येथे कार्यक्रमात उपस्थित होते. पंतप्रधानांनी विखे पाटील यांचा गौरवपूर्ण उल्लेख करताना त्यांच्या शेती आणि पाणी विषयक ज्ञानाचा विशेष उल्लेख केला. राजकीय पक्षपलीकडे जाऊन विखे पाटलांनी त्यांच्या दुष्काळमुक्ती आणि पाणी प्रश्नांवर आयुष्यभर लक्ष केंद्रित केले हे त्यांनी आवर्जून सांगितले.
713पानांच्या आत्मचरित्रा-तील अनेक घटनांचे महत्त्वपूर्ण उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून मराठीतून वाचून दाखवले महाराष्ट्राच्या दुष्काळ मुक्ती संदर्भात बाळासाहेब विखे पाटलांची व्यापक दृष्टी या आत्मचरित्रातून महाराष्ट्रातील जनतेला समजेल संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला केंद्र सरकारने नुकत्याच लागू केलेल्या कृषी सुधारणा कायद्यातील अनेक तरतुदी बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्वप्नातील शेतीशी संबंधित सूचनांवर आधारित आहेत असे पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले.
शेतीचे पारंपरिक ज्ञान आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड हे बाळासाहेब विखे पाटील यांचे व्हिजन होते शेतकरी समृद्ध झाला पाहिजे आपला विभाग दुष्काळ मुक्त झाला पाहिजे शेती फक्त निसर्गावर आधारित न राहता तिला नवीन तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे सिंचन व्यवस्था ते पण व्यवस्था या सर्व व्यवस्था शेतकरीकेंद्रित आणि ग्राहक केंद्रित झाल्या पाहिजेत हा दृष्टिकोन विखे पाटलांनी अनेक वर्षे मांडला त्याचे प्रतिबिंब त्यांच्या आत्मचरित्रात पडले आहे. याच दृष्टिकोनातून केंद्रानेही कृषी कायद्यांची सुधारणा करताना पारंपारिक ज्ञानाबरोबरच शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकर्‍याला मुक्त बाजार व्यवस्थेचा आणि प्रगतीचा मार्ग खुला केला आहे, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंधांवर प्रकाश टाकला. बाळासाहेब विखे पाटलांची सारख्या अनुभवी नेत्याला अटलजींच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी देऊन बाळासाहेब ठाकरे यांनी हिरा कोंदणात बसवला, असा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटिल यांचीही समयोचित भाषणे झाली राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान व सर्व मान्यवरांचे स्वागत केले, तर खासदार सुजय विखे पाटील यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. ’पहिल्या पाणी परिषदेत 1970 मध्ये त्यांनी सर्वपक्षीय लोकांना एका मंचावर आणले. तेव्हा त्यांच्या पक्षाने त्यांना नोटीस दिली होती. पण त्यांनी पाणी प्रश्न हा सर्वांचाच प्रश्न असल्याचं त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितलं होतं,’ अशी एक आठवणही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सांगितली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंत्री सुभाष भांबरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, हर्षवर्धन पाटील, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, आमदार सुरेश धस, रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार , बी.जे कोळसे पाटील प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित होते.
तर शिवसेना खासदार धैर्यशिल माने, खासदार सुजय विखे , प्रितम मुंडे , धनश्री विखे या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होत्या. परखडपणे मत व्यक्त करणारे नेते म्हणून ओळख असणारे बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्रातून अनेक राजकीय गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. शिवसेना प्रवेश ते राजीनामा , पवार - विखे संघर्षाची किनार, राजीव गांधी यांच्या काळात उभारलेला युथ फोरम, पुलोद स्थापनेवेळी शरद पवारांचे स्थान यासह अनेक राजकीय संघर्षावर बाळासाहेब विखे-पाटील यांनी आत्मचरित्रात भाष्य केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.



No comments:

Post a Comment