माध्यम आणि सामाजिक संस्थांचे कार्य महत्त्वपूर्ण : डॉ. कुलकर्णी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, October 13, 2020

माध्यम आणि सामाजिक संस्थांचे कार्य महत्त्वपूर्ण : डॉ. कुलकर्णी

 माध्यम आणि सामाजिक संस्थांचे कार्य महत्त्वपूर्ण : डॉ. कुलकर्णी

स्वयंपूर्ण फौंडेशनतर्फे माध्यमप्रतिनिधींचा ‘कोराना योध्दा’ सन्मान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः समाजात खूप मोठ्या प्रमाणात गरजू आहेत. वंचित, निराधार, पिडीतांना न्याय मिळण्यासाठी, त्यांना जगण्याचा हक्क मिळण्यासाठी माध्यमे व सामाजिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे. स्वयंपूर्ण फौंडेशनसारख्या संस्था असे कार्य करीत असल्याने अनेकांना मोठा आधार मिळतो. करोना काळात अशाच कामातून गरजूंना मदत मिळण्याचे मोठे कामझाले आहे, असे प्रतिपादन स्नेहालयाचे डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी केले.
स्वयंपूर्ण फौंडेशनच्यावतीने सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल डॉ.कुलकर्णी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फौंडेशनच्यावतीने महानगर न्यूज या वृत्तवाहिनीच्या टिमलाही करोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास स्वयंपूर्ण फौंडेशनचे संस्थापक प्रा.नाथाभाऊ पंडित, खुर्शीद पठाण, फैय्याज पठाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेेब भुजबळ, तुषार चोरडिया, भरत कुलकर्णी, माजी नगरसेविका सुनंदा भुजबळ, महानगर न्यूजचे प्रा.डॉ.विजय म्हस्के, सचिन शिंदे, सचिन कलमदाणे, यतीन कांबळे, सागर म्हस्के, विक्रमलोखंडे, मयूर नवगिरे, मनिषा इंगळे-जोशी, स्नेहा जोशी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रा.नाथाभाऊ पंडित म्हणाले की, समाजातील गरजू विद्यार्थी, वृध्द, विधवा महिला अशा विविध घटकांना आवश्यक तिथे योग्य मदत करण्याच्या उद्देशाने फौंडेशन कार्यरत आहे. समाजाचाच एक भाग असलेल्या वंचितांप्रती आपण प्रत्येकाने स्नेहभाव ठेवला पाहिजे. स्नेहालयसारखी तीन दशकांपासून समाजासाठी कार्य करणारी संस्था आमचे प्रेरणास्थान आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here