पारनेर तालुक्यातील संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना दोन महिन्यापासून अनुदान नाही ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 5, 2020

पारनेर तालुक्यातील संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना दोन महिन्यापासून अनुदान नाही !

 पारनेर तालुक्यातील संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना दोन महिन्यापासून अनुदान नाही !

शासनाने अनुदान वर्गच केले नसल्याने लाभार्थी वंचित.

लाभार्थ्यांनी आधार कार्ड संलग्न करून घ्यावे ः तहसिलदार ज्योती देवरे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  पारनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्राप्त होणारा निधी शासनाकडून दोन महिन्यापासून प्राप्त न झाल्यामुळे तालुक्यातील लाभार्थ्यांना त्याचे पैसे मिळाले नाहीत. यामुळे अनेक लाभार्थी सध्या बँकेमध्ये चकरा मारत आहेत तसेच पैसे नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे पण शासनाकडूनच अनुदान प्राप्त झाले नाही त्यामुळे संजय गांधी शाखेतून लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले नाही अशी माहिती शाखेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.राज्यात कोरोना च्या संकटामुळे अनेक योजनांना सरकारने खीळ घातली आहे तर काही योजनांचे निधी उशिराने लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत पारनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा अपंग परित्यक्ता अनाथ श्रावण बाळ निराधार आदी योजनेअंतर्गत लाभ घेणार्‍या लाभार्थ्यांना 1000 रु अनुदान मिळत असते मात्र जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे अनुदान सध्या प्राप्त झाले नाही त्यामुळे अनेक लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत तालुक्यांमध्ये जवळपास 34 हजार या योजनेचे लाभार्थी आहेत त्यामुळे हे लाभार्थी अनुदानासाठी वारंवार बँकेत चौकशीसाठी येत असतात अनेक वर्षे त्यांना नियमित महिन्याच्या 5 तारखे दरम्यान त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत असतात मात्र दोन महिन्यापासून पैसे जमा झाले नाही अनुदानासाठी तहसील कार्यालयाच्या मार्फत माहिती पाठवून देण्यात आलेली आहे तसेच तहसील कार्यालयातून याबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात आला आहे लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत अनुदान आल्यानंतर त्वरित त्याचे आदेश काढून बिल तयार करण्यात येते लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाते मात्र सध्या अनुदानास विलंब झाल्याने लाभार्थी ही चिंतेत पडले आहेत शासन पातळीवरून लाभार्थ्यांना लवकरच अनुदान प्राप्त होईल अशी माहिती संजय गांधी निराधार शाखेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे तसेच ज्या लाभार्थ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न केले नाही त्यांनी ते त्वरित संलग्न करून घ्यावे असे तहसीलदार यांनी सांगितले आहे. संजय गांधी योजनेअंतर्गत लाभार्थ्याचे आधार कार्ड अनेक वेळा मुदत देऊनही संलग्न करण्यात आले नाही त्या लाभार्थ्यांना या महिनाअखेर आधार कार्ड बँकेशी संलग्न करण्याची मुदत दिली गेली आहे ज्या लाभार्थ्यांनी आधार कार्ड संलग्न केले नाही त्यांचे अनुदान बंद होणार आहे त्यामुळे आधार कार्ड बँकेशी संलग्न नाही त्यांनी त्वरित संलग्न करून घ्यावे असे अवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment