ईगल प्राईड, बुरूडगाव रोड येथील समर्थ कोव्हिड हेल्थ सेंटरचे उद्घाटन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 5, 2020

ईगल प्राईड, बुरूडगाव रोड येथील समर्थ कोव्हिड हेल्थ सेंटरचे उद्घाटन.

 ईगल प्राईड, बुरूडगाव रोड येथील समर्थ कोव्हिड हेल्थ सेंटरचे उद्घाटन.

कोव्हिड सेंटर हि काळाची गरज, जिल्ह्यातील कोरोना बाधितांना फायदा ः अभिजित खोसे



नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः  सध्याच्या परिस्थितीत अद्यावत कोव्हिड सेंटर हि काळाची गरज असून जिल्ह्यातील  बाधितांना याचा निश्चित फायदाच होईल असे मत जिल्हा राष्ट्रवादीयुवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांनी केले. ईगल प्राईड, बुरूडगाव रोड येथील समर्थ कोव्हिड हेल्थ सेंटरचे उद्घाटन  राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते , आयसीयु विभागाचे उद्घाटन जिल्हा केमिस्ट असो.चे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्या हस्ते तर औषध विभाग  व लँबचे उद्घाटन  संगणक प्रणाली तज्ञ रविंद्र गीते, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.पियुष मराठे ,संचालक डॉ.शुभम भूतकर ,संचालक डॉ.अरविंद गीते, संचालिका रुपाली गिते, अशोक भूतकर, रीणुल गवळी, जमीर शेख, अल्त्ताफ सय्यद,मोसिन सय्यद व मान्यवर उपस्थित होते.डॉ.पियुष मराठे यांनी सांगितले की, आजच्या परिस्थितीत कोव्हिड बाधितांना वेळेवर उपचार व बेड उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक झाले असून अत्यंत उत्तम सेवा देण्यासाठी हे सेंटर सुरु करण्यात आले आहे.या ठिकाणी 15 बेड उपलब्ध असून पाच बेड आयसीसु ने परिपूर्ण आहेत.24 तास तज्ञ डॉक्टर व ऑक्सिजन सेवा येथे उपलब्ध असूनशासकीय नियमांचे परिपूर्ण पालन केले जाईल. डॉ.अरविंद गीते म्हणाले की, येत्या काळात सुसज्ज कोव्हिड सेंटरची गरज व संख्या वाढणार आहेच, त्यामुळे  हे सेंटर सुरु करण्यात आलेले असून समर्थ अँक्सिडेंट हॉस्पिटलच्या रुग्णांची गेरसोय होऊ नये यासाठी  ईगल प्राईड मध्येच दुसर्‍या ठिकाणी ओपीडी व सेवा सुरु करण्यात आली आहे. ईगल प्राईड व स्वत:च्या परिवाराची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य असून त्यासाठी समर्थ कोव्हिड हेल्थ सेंटर व समर्थ अँक्सिडेंट हॉस्पिटल हे दोन्ही विभाग वेगळे असणार आहेत.डॉ.शुभम भूतकर यांनी उपस्थित मान्यवर व सर्वांचे स्वागत केले. या कोव्हिड सेंटर मध्ये येणारे सर्व रुग्ण बरे होऊन जातील या दृढ विश्वासाने मी व माझे सहकारी कार्यरत असणार आहोत, त्यासाठी समाजाने चांगला व सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी दत्ता गाडळकर व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास मनोज खेडकर, प्रदीप गीते, हेमलता गीते, वैभव भूतकर, पवन पटेकर, कोमल उमाप, किरण रासकर, पराग झावरे, अ‍ॅड. मनिष गीते, गीतांजली गीते, अभिजित गांगर्डे, विनायक भूतकर व स्टाफ उपस्थित होता.

No comments:

Post a Comment