उत्तम संघटक असणारे किरण काळे संघर्षवादी नेतृत्व ः आ.डॉ.सुधीर तांबे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 5, 2020

उत्तम संघटक असणारे किरण काळे संघर्षवादी नेतृत्व ः आ.डॉ.सुधीर तांबे

 उत्तम संघटक असणारे किरण काळे संघर्षवादी नेतृत्व ः आ.डॉ.सुधीर तांबे

चार पक्षांचे उंबरे झिजवणार्‍यांन स्थान दिले जाणार नाही ः किरण काळे

ना.बाळासाहेब थोरात, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ. सुधीर तांबे  यांच्या नेतृत्वाखाली शहरात काँग्रेस मजबूत केली जाईल.कार्यकर्त्यांच्या मनातील भावना मांडत असताना त्यांनी पक्षांतर्गत कुरघोड्या करणार्‍यांचा खरपूस समाचार घेतला. जी लोक चार पक्षांचे उंबरे झिजवतात अशांना इथून पुढे पक्षात कवडीचीही किंमत दिली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. अशांनी दिल्या घरी सुखी राहावे. आम्ही फाटक्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊ. गोरगरिबांना पुढे आणू. सामान्य कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या माध्यमातून नेता बनवू. पण पक्षाशी गद्दारी करणार्‍यांना इथून पुढं कोणत्याही परिस्थितीत पक्षात थारा दिला जाणार नाही असे सांगत काळे यावेळी अनेकांवर नाव न घेता तोफ डागली. लवकरच वरिष्ठ नेत्यांच्या मान्यतेने शहर कार्यकारिणी गठीत केली जाणार असल्याचे यावेळी काळे यांनी जाहीर केले.



नगरी दवंडी /प्रिंतनिधी
अहमदनगर ः किरण काळे हे उत्तम संघटक असून संघर्षवादी नेते आहेत, असे प्रतिपादन काँग्रेसचे आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे. काळे यांच्या शहर जिल्हाध्यक्ष निवडीनंतर आज शहर काँग्रेसची पहिली संघटनात्मक बैठक माऊली मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडली. त्यावेळी आ.तांबे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आ.लहू कानडे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, माजी महापौर दीप चव्हाण, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, विविज्ञ माणिकराव मोरे आदी उपस्थित होते.आ.तांबे म्हणाले की, शहरातील पक्षसंघटना बांधणीची जोरदार सुरवात झाली असून किरण काळे हे नव्या दमाच्या चेहर्‍यांना हेरून त्यांना काँग्रेस पक्ष संघटनेमध्ये योग्य ते स्थान देतील. संघटनेत स्थान देत असताना जो कार्यकर्ता कोणत्याही गोष्टीला बळी न पडता पळून जाणार नाही, काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहील अशाच  कार्यकर्त्यांना त्यांनी संधी द्यावी, असा सल्ला यावेळी आ.तांबे यांनी यावेळी दिला.आ.लहू कानडे म्हणाले की, किरण काळे हे स्वतः कलाकार आहेत. उच्चशिक्षित आहेत. त्यांना सामाजिक कार्याचा वारसा आहे. त्यामुळे असे सर्वगुणसंपन्न प्रतिभान युवा नेतृत्व नगर शहर काँग्रेसला मिळाल्यामुळे नगर शहरात निश्चितपणे काँग्रेसची संघटना ही अल्पावधीत उभी राहील. या ठिकाणी असणारी मोठी उपस्थिती ही नगर शहरातील काँग्रेस पक्षाच्या आगामी जोरदार बांधणीची नांदी आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे म्हणाले की, काळे हे 24  तास नगरकरांसाठी उपलब्ध असतात. रात्री-अपरात्री सुद्धा कोणी त्यांच्याशी संपर्क केला तर ते तत्परतेने त्याच्या मदतीला धावून जातात. ते निश्चित उत्तम संघटना उभी करतील.जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी यावेळी नगर शहरामध्ये काँग्रेस नक्कीच कात टाकेल असा विश्वास व्यक्त केला. माजी महापौर दीप चव्हाण यांनी आपण संघटनेसाठी पूर्ण वेळ देणार असल्याचे सांगितले.बैठकीच्या सुरुवातीला माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, स्व. अनिलभैय्या राठोड, स्व.प्रदीप गांधी, स्व.अशोक काळे, स्व. ज्ञानदेव दळवी आणि कोरोनाने दु:खद निधन झालेल्या नगर शहरातील सर्व नागरिकांना एक मिनिट मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाच्या सर्व फ्रंटलचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. अन्वर सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. रिझवान सेख यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment