तरूण व महिला सरपंचांच्या हातात सत्ता असली की विकास होऊ शकतो - शेळके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 15, 2020

तरूण व महिला सरपंचांच्या हातात सत्ता असली की विकास होऊ शकतो - शेळके

तरूण व महिला सरपंचांच्या हातात सत्ता असली की विकास होऊ शकतो - शेळके

 पानोलीग्रामपंचायत विविध विकास कामांचे लोकार्पण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः तरुण व महिला सरपंचाच्या हातामध्ये गावची सत्ता दिली तर निश्चितपणे विकास होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण पानोली च्या सरपंच अर्चना गायकवाड आहेत त्यांनी अल्पावधीतच गावांमध्ये अनेक विकासकामे राबवले आहेत महिला सक्षम झाल्या तर निश्चित गावाचा विकास होऊ शकतो असे वक्तव्य पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी केले आहे.
     पानोली येथील विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड आझादभाऊ ठुबे यांच्या हस्ते व पंचायत समिती चे सभापती गणेश शेळके यांच्या अध्यक्षतेखाली व  पंचायत समितीचे सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत  पार पडला. त्या मध्ये प्रामुख्याने जि प प्रा शाळेची दुमजली इमारत, पाण्याची विविध टाक्या, गटार योजना, आरोग्य खोली, लोखंड पाणी पुरवठा पाईपलाईन, ओपन जिम (व्यायामशाळा साहित्य) तसेच शॉपींग कॉम्प्लेक्स व गावचे वेश (प्रवेशद्वार) इ. कामांचा  साधारण 80 लाख रुपयांचे विकास कामाचा समावेश आहे.
    त्या प्रसंगी कॉ. आझादभाऊ ठुबे यांनी गावातील ग्रामपंचायत च्या विकास कामांचे कैतुक केले व कामांच्या दर्जा वर समाधान व्यक्त केले. तर सभापती यांनी तरूणांच्या व महिला सरपंचांच्या हातात सत्ता असली का किती काम होवु शकते यावर समाधान व्यक्त केले गायकवाड यांनी  सांगलीमध्ये  चांगल्या पद्धतीने महिला संघटन उभे केले आहे पानोली गावांमध्ये अनेक विकास काम करण्यामध्ये सरपंच अर्चना गायकवाड यांनी मोठा सहभाग नोंदवला आहे. तसेच डॉ श्रीकांत पठारे यांनी पानोली गावचे राजकारण कधीही विकासाला अडचण करत नाही तर संपुर्ण गाव एक होवुन गावचा विकासासाठी एकत्र येतात याचे विशेष महत्व व्यक्त केले.
     याचप्रमाणे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच अर्चना अंकुश गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी यांचा कार्यकाळ संपत असल्याने सर्व ग्रामस्थांनी सर्व कार्यकारी मंडळाचा मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या हस्ते मान सन्मान करून गैरव केला. तसेच तया प्रसंगी तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष इंद्रभान गाडेकर यांनी जरी तुमचा कार्यकाळ संपत असला व सध्या प्रशासक निवड होवुन प्रशासक काम पाहनार असले तरी सरपंच व उपसरपंच यांना आवाहन केले की नविन कार्यकारी मंडळ निवड होईपर्यंत गावचा कारभार पाहताना तुम्ही मदत करावी. त्यास सरपंच अर्चना अंकुश गायकवाड व उपसरपंच शशीकांत भगत यांनी संमती दाखवली.
     माजी उपसरपंच हरिभाऊ गायकवाड म्हटले की पाच वर्षापुर्वी जो ग्रामस्थांनी विश्वास दाखविला व जे मतांचे कर्ज दीले त्याचे विविध विकास कामे मार्गी लावुन उतराई होताना समाधान वाटत आहे यावेळी  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश गायकवाड, माजी उपसरपंच हरिभाऊ गायकवाड,बाळासाहेब गाडेकर, संदिप शिंदे, रामराव गाडेकर, राजेंद्र गायकवाड, रामदास भगत, समीर झगडे, दिपकराव इंगळे, सोसायटी चे चेअरमन नामदेवराव गाडेकर, पत्रकार दत्ता झगडे अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रस्तावना अंकुश गायकवाड यांनी तर सुत्रसंचालन बाळासाहेब गाडेकर यांनी केले. आभार प्रदर्शन  समीर झगडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment