दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत मनसे आवाज उठविणार-वर्मा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 15, 2020

दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत मनसे आवाज उठविणार-वर्मा

 दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत मनसे आवाज उठविणार-वर्मा

मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने दिव्यांगास स्टॉल


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
समाजातील होतकरुंना कामासाठी मदत केल्यास ते स्वत:बरोबरच इतरांचीही प्रगती करु शकतात. छोटीशी मदत आणि प्रोत्साहन हे त्यांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतात. त्यात दिव्यांग व्यक्ती ही स्वाभिमानी असतात. आपल्या दिव्यांगावर मात करुन स्वत:च्या कर्तुत्वाने एखाद्या क्षेत्रात आपले नाव कमतात. कष्ट करण्याची तयारी त्यांच्यात आहे, त्यामुळेच अशा व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने मदतीचा हात देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम करण्यात येत आहे. वास्तविक पाहता हे काम शासन, महापालिका यांचे आहे. दिव्यांगासाठीच्या अनेक योजना आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. परंतु मनसे विद्यार्थी सेना याबाबतही आवाज उठवून दिव्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. आज या स्टॉलच्या माध्यमातून चांगली सेवा मिळेल. त्यातून एक कुटूंब उभे राहिल. यापुढेही असेच कार्य आम्ही करु, असे प्रतिपादन सुमित वर्मा यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने दिव्यांग व्यक्तीस स्टॉल टपरी देऊन त्यांचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, नानासाहेब डोंगरे, सागर शिरपुर, चाँद शेख, बाहुबली वायकर, अर्चना वायकर उपस्थित होते.
याप्रसंगी बाबासाहेब महापुरे म्हणाले, दिव्यांच्या प्रश्नांबाबत आम्ही सातत्याने आवाज उठवत असतो, परंतु प्रशासनाच्यावतीने प्रतिसाद मिळत नाही. आज मनसे विद्यार्थीसेनेच्यावतीने दिव्यांगास स्टॉल उपलब्ध करुन दिला आहे. गटाई कामगारांच्या धर्तीवर मनापाने दिव्यांगांना मनपा हद्दीत स्टॉल उपलब्ध करुन द्यावे.


No comments:

Post a Comment