रहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 30, 2020

रहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी

 रहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये

उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
सारसनगर परिसरात या कोविड सेंटरला परवानगी देऊ नये. परवानगी दिल्यास नगरसेवकासह नागरिक महिला तीव्र स्वरुपाचे आंदोलन आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना निवेदनाद्वारे देण्यात आले. कोरोना हा संसर्ग विषाणू आहे. एकमेकांपासून संसर्ग वाढण्याची भीती मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये दररोज रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शासन एकीकडे संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करत आहे तर दुसरकडे अहमदनगर महानगरपालिका दाटवस्ती भागातच कोविड सेंटरला परवानगी देण्याचे काम करत आहे. सारसनगर रोडवरील निशांत रो-हाऊसिंग, निलायम रो-हाऊसिंग, कर्पे मळा, निळकंठ कॉलनी, आनंद पार्क हा परिसर दाट लोकवस्तीचा असून तसेच मार्केटयार्ड, भाजी मार्केट व सारसनगरला जाणारा मुख्य रस्ता विश्वास नर्सिंग होम या हॉस्पिटलपासून जात आहे. या ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्याबाबत हालचाली सुरू आहे. हे कोविड सेंटर चालू केल्यास या आजाराचे संक्रमण होऊन शेकडो नागरिकांना या आजाराला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिसरात या कोविड सेंटरला परवानगी देऊ नये. परवानगी दिल्यास नगरसेवकासह नागरिक महिला तीव्र स्वरुपाचे आंदोलन आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना निवेदनाद्वारे देण्यात आले.
    यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, अविनाश घुले, प्रशांत पाठक, उमाकांत शेरकर, सुशील शिंगवी, कृष्णा भुतडा, हिरालाल चोपडा, राजेंद्र लोढा, योगेश मेहेर, किसन कर्पे, राजू ससाणे, धनेश मुनोत आदी नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment