नगर पाठोपाठ कर्जत-जामखेडमध्ये भाजपाला धक्का... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 30, 2020

नगर पाठोपाठ कर्जत-जामखेडमध्ये भाजपाला धक्का...

 नगर पाठोपाठ कर्जत-जामखेडमध्ये भाजपाला धक्का...

दोन नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश; तीन नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाट्यावर!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत - जामखेड ः कर्जत नगरपंचायतीच्या भारतीय जनता पक्षाच्या 2 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून जामखेडमधील ही 3 ाजपा सहयोगी नगरसेवक भाजपा सोडून राष्ट्रवादीच्या वाटेवर असून भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
    कर्जत तालुका भारतीय जनता पक्षात पडलेले गट व यामुळे होणारी कोंडी, भाजप नेतृत्वाची काम करण्याची मानसिकता याला वैतागून कर्जत नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक बापूसाहेब नेटके व नगरसेविका मनिषा सोनमाळी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे यांच्या उपस्थितीत आमदार रोहित पवार यांच्या कर्जत येथील निवासस्थानी बुधवारी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. जामखेडमधील माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, नगरसेवक मोहन पवार, राजेश वाव्हळ हे तीन नगरसेवक लवकरच आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याचे  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा मधूकर राळेभात यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. कर्जतमधील या दोन नगरसेवकांबरोबरच भाजपचे तालुका उपाध्यक्ष सतिष पाटील, भाजपचे युवा नेते सचिन सोनमाळी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश भंडारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील शेलार, उद्योजक दादासाहेब थोरात, भास्कर भैलुमे, रवि पाटील आदी उपस्थित होते. 10 ऑक्टोबर रोजी कर्जत तालुक्यातील अनेक बड्या  दोन नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश; तीन नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाट्यावर नेत्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे, अशी माहिती नगरसेवक बापूसाहेब नेटके यांनी दिली.कर्जत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेले हे सत्तांतर म्हणजे सत्ता परिवर्तनाची सुरुवात आहे, असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी व्यक्त केले. जामखेडमधील  पत्रकार परिषदेत जामखेड कर्जत विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रा मधूकर राळेभात, माजी उपसभापती सुर्यकांत मोरे, माजी सभापती सूभाष आव्हाड, नगरसेवक अमित जाधव, आसिफ शेख, मनोज वराट,विकास राऊत, बापू शिंदे, दयानंद कथले, सरपंच अनिल भोरे, आशोक धेंडे, अमोल जावळे, सतिश चव्हाण पिंटू काळे आदी उपस्थित होते यावेळी नगरसेवक महेश निमोणकर व मोहन पवार  यांनी सांगितले की  नगरपरिषदला आम्ही अपक्ष निवडून आलो मात्र राम शिंदे यांच्यामुळे नगरसेवक राजेश वाव्हळ सह तीघेही भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून प्रामाणिकपणे काम केले मात्र भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी मानसन्मान ठेवला नाही.  आमदार रोहित पवार यांच्या कामामुळे प्रभावित होऊन जामखेड शहराच्या विकासासाठी  आम्ही यूवा नेतृत्व आमदार रोहित पवार यांच्या बरोबर काम करणार आहे. व शहरातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार रोहित पवार यांचे नेतृत्वाखाली काम करणार आहे.

No comments:

Post a Comment