कामचुकार अधिकार्‍यांची गय नाही ः आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 30, 2020

कामचुकार अधिकार्‍यांची गय नाही ः आ. जगताप

 आमदार व महापौर यांनी केली खड्डे बुजविण्याच्या कामाची पाहणी

कामचुकार अधिकार्‍यांची गय नाही ः आ. जगताप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरामध्ये विविध ठिकाणी रस्त्यावरील साफ सफाई रस्त्याच्या कडेने असलेले दगड गोटे, गवत साफ सफाई करण्याच्या कामास सुरूवात झाली. तसेच पाऊस उघडल्यानंतर लगेच महानगरपालिका हद्दीतील रस्त्यावरील पडलेल्या खड्डयाचे मजबुतीकरण व खडीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यापुढील काळात कामचुकारपणा करणार्‍या अधिकार्‍यांची गय केली जाणार नाही प्रत्येकाने आपआपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी असे प्रतिपादन आ. संग्रामभैय्या जगताप यांनी केले आहे.
गंगा उद्यान रोडवरील खड्डयाची पाहणी करताना आ.संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय ढोणे,  अजिंक्य बोरकर, अमोल गाडे, अमित खामकर, घनकचरा विभाग प्रमुख पैठणकर, विद्युत विभाग प्रमुख मेहेत्रे, अभिजीत चिप्पा, पुष्कर कुलकर्णी, गोरख पडोळे, आदी उपस्थित होते. यावेळी वाकळे म्हणाले की, नगरशहरामध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्डयामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला परंतु पावसामध्ये डांबराने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेता येत नाही. आता पाऊस उघडला आहे. नगर शहरातील सर्व खड्डे बुजविण्याचे काम हाती घेणार आहे. नगर शहरातून महामार्ग व राज्यमहामार्गाचे रस्ते जात असून यावरही मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत ते बुजविण्याचे काम बांधकाम विभाग लवकरच सुरू करणार आहे. नगर शहरामध्ये अमृत भुयारी गटर योजनेचे काम सुरू आहे. तसेच पावसामुळे डांबरीकरणाचे कामे करता येत नाही. विविध रस्त्याची कामे मंजूर असून लवकरच या रस्त्याची कामेही सुरू होतील, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment