फटाका विक्री परवाना ऑनलाईन करण्याची बोज्जा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 15, 2020

फटाका विक्री परवाना ऑनलाईन करण्याची बोज्जा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 फटाका विक्री परवाना ऑनलाईन करण्याची बोज्जा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे फटाका विक्री परवाना ऑनलाईन करण्यात यावी अशी मागणी दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व मा. जिल्हाधिकारी व मा. जिल्हा पोलीस अधिक्षक अहमदनगर यांच्याकडे केली आहे.
   नुकतेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री यांनी सध्याच्या परिस्तिथीचा विचार करून संपूर्ण उत्तरप्रदेश राज्या मध्ये यंदाच्या दिवाळी सणासाठी फटाका विक्री परवाना ऑनलाईन करण्याचे आदेश दिले असून सदर परवाने एक महिना अगोदर देण्यात यावे असेही आदेश देण्यात आले. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ही सध्याचे परिस्थिती चे गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.  कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावा मुळे व्यापारी वर्ग कमकुवत झाला आहे. फटाका व्यवसाया वर लाखो कुटुंब अवलंबून आहेत अशा परिस्थिती मध्ये व्यापार्‍यांना व्यवसाय करणे सुलभ व्हावे या करिता प्रशासनाने सहकार्य करणे गरजेचे आहे. हा व्यवसाय ठराविक कालावधी साठी असून याच कालावधीमध्ये व्यापार्‍यांना मदत होणे गरजेचे आहे.
जर प्रशासनाने व्यापार्‍यांना सहकार्य न केल्यास व्यापारी रस्त्यावर येतील. हा परवाना एक महिना अगोदर दिल्यास ग्राहकांना ही सोयीस्कर रित्या फटाका खरेदी करता येईल व सोशल डिस्टन्सिंग च्या नियमाचा भंग होणार नाही. परंतु कमी वेळात परवाना दिल्यास व्यापार्‍यांना अनेक संकटाना तोंड दयावे लागेल  याची गांभीर्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश सरकारने फटाका विक्री परवाना ऑनलाईन केले व एक महिना अगोदर परवाना देण्याचे आदेश दिलेत त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात फटाका विक्री परवाना ऑनलाईन करण्यात यावे व 1 महिना अगोदर देण्याचा आदेश अधिकार्‍यांना द्यावा.

No comments:

Post a Comment