बाळासाहेब माळी यांचा मनसेत प्रवेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 14, 2020

बाळासाहेब माळी यांचा मनसेत प्रवेश

 बाळासाहेब माळी यांचा मनसेत प्रवेश


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः
पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी रविवारी मनसेचे नेते, माजी मंत्री बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे पक्षप्रवेश  केला आहे  
बाळासाहेब माळी यांनी  एकलव्य फाउंडेशन व जाणता राजा प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी तालुकाभर मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे.
साई बाबा मंदिर दर्शनासाठीखुले करावे या मागणीच्या आंदोलनानिमित्त रविवार मनसे नेते बाळा नांदगावकर   व जिल्ह्यातील इतर मनसेचे पदाअधिकारी शिर्डी येथे उपस्थित होते या आंदोलानंतर शिर्डीच्या  शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या बैठकित माळी यांना पक्षात प्रवेश देण्यात आला.  मनसेचा पंचा गळ्यात घालुन  नांदगाव यानी माळी यांचे पक्षात स्वागत केले
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.परंतु झावरे हे राष्ट्रवादी पासुन अलिप्त झाल्यामुळे बाळासाहेब माळी हे पक्षाच्या संपर्कात नव्हते. दरम्यानच्या काळात माळी यांचा मनसेत प्रवेश निश्चित झाला होता.मात्र, लॉकडाऊनमुळे हा पक्षप्रवेश लांबणीवर पडला होता.
तालुक्याच्या बदलत्या राजकारणामुळे  त्यांनी महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत त्यांनी प्रवेश केला आहे
या पक्षप्रवेशावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, बाळासाहेब शिंदे,नितीन भुसारे, अविनाश पवार ,मारुती रोहोकले,सतीश म्हस्के,वसीम राजे, विलास कोरडे , जानकु वाव्हळ  उपस्थित होते.


No comments:

Post a Comment