मोफत उपचार व सुविधांमुळे रुग्ण लवकर बरे होतील - वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 14, 2020

मोफत उपचार व सुविधांमुळे रुग्ण लवकर बरे होतील - वाकळे

 मोफत उपचार व सुविधांमुळे रुग्ण लवकर बरे होतील - वाकळे

नटराज कोविड केअर सेंटरमधून पहिल्या 22 रुग्णांना डिस्चार्ज


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर शहरात वाढत असलेल्या कोरोना मुळे कोविड उपचार सेंटरची गरज ओळखून महापालिका, भाजप व पंडित दीनदयाळ पतसंस्थाच्या वतीने पुढाकार घेत नटराज हॉटेलमध्ये मोफत उपचार केंद्र सुरु केले आहे. त्यामुळे गरजू व गरीब रुग्णांना चांगले उपचार व सोयीसुविधा मिळत आहेत. तज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून औषधोपचार, दर्जेदार जेवणा बरोबरच सर्व दैनदिन वस्तू मोफत उपलब्ध करून दिल्याने सर्वसामान्य रुग्णांची याठिकाणी चांगली देखभाल घेतली जाता आहे. भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मनपाचे अधिकारी, नगरसेवक चांगले योगदान देत आहे. त्यामुळे नटराज कोविड केअर सेंटर मधून रुग्ण लवकर बरे होऊन घरी जातील, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
महानगरपालिका, शहर भारतीय जनता पार्टी व पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने हॉटेल नटराज मध्ये सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये पहिल्या लॉट मध्ये अ‍ॅडमिट झालेल्या करोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थितीत पूर्ण बरे झालेल्या पहिल्या22 रुग्णांना घरी सोडण्यात आले.
यावेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा, संघटन सरचिटणीस अ‍ॅड. विवेक नाईक, महेश नामदे, तुषार पोटे, संजय ढोणे, अजय चितळे, सतीश शिंदे, पी.डी. कुलकर्णी, शिवाजी दहींडे, गणेश साठे, श्रीकांत दराडे, निलेश चिपाडे, अमेय मुळे आदि उपस्थित होते.
   गुलाबपुष्पाच्या पाकळ्या यावेळी करोनामुक्त झालेल्या रुग्णांवर उधळण्यात आल्या.महेंद्र गंधे म्हणाले, करोना आजारावर मात करण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. त्यामुळे करोनावर मात केलेल्या रुग्णांनी नव्याने करोना बाधित झालेल्या रुग्णांना मार्गदर्शन करावे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णांची चांगली देखभाल याठिकाणी घेतली आहे. मुनोत परिवाराचे  नटराज हॉटेलची वास्तू या कोविड केअर सेंटरला उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार. दानशूर व्यक्ती व संस्थांनी या उपचार केंद्राला सर्व प्रकारची मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment