तपोवन रस्त्याला लोकनेते दिगंबर महाराज ढवण यांचे नाव देण्यात यावे : महापौरांना निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 17, 2020

तपोवन रस्त्याला लोकनेते दिगंबर महाराज ढवण यांचे नाव देण्यात यावे : महापौरांना निवेदन

तपोवन रस्त्याला लोकनेते दिगंबर महाराज ढवण यांचे नाव देण्यात यावे : महापौरांना निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सावेडी उपनगरातील महत्वपूर्ण रस्ता असणार्या तपोवन रस्त्याला भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा कार्यकारिणी निमंत्रित सदस्य लोकनेते स्व.दिगंबर महाराज ढवण यांचे नाव देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन महापौर बाबासाहेब वाकळे यांना देण्यात आले. याप्रसंगी ऋषीकेश ढवण, निशांत दातीर, कैलास गर्जे, दत्ता हजारे, सागर पोळ, सचिन खाटेकर आदि उपस्थित होते.
स्व.दिगंबर ढवण यांच्या दशक्रिया विधीनंतर आयोजित शोकसभेत शिवसेनेचे भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, माजी सभापती सचिन जाधव, भाजपचे जिल्हा कार्यकारिणीचे बाबासाहेब सानप, विशाल नाकाडे, अनिल बोरुडे, आनंद लहामगे, स्वप्नील दगडे यांनी वरिल मागणी केली होती.  याबाबतचे निवेदन आज महापौर बाबासाहेब वाकळे, महापालिका प्रशासनास देण्यात आले आहे, तरी यावर तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
  स्व. दिगंबर ढवण यांनी सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्याच्या कामासाठी तब्बल 43 वेळा पत्रव्यवहार केला. अनेक अभिनव आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. दुर्दैवाने त्यांचा अंत झाल्याने त्यांचे कार्य पुढील पिढीला स्मरणात रहावे, या हेतूने या रस्त्याला ढवण यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

No comments:

Post a Comment