रक्तदानाचा उपक्रम गरजवंतांना जीवनदान देणारा-तवले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 17, 2020

रक्तदानाचा उपक्रम गरजवंतांना जीवनदान देणारा-तवले

 रक्तदानाचा उपक्रम गरजवंतांना जीवनदान देणारा-तवले

भाजप युवा मोर्चाच्यावतीने मोदींच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाने देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर उंचावली आहे. नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीने सर्व नागरिकांसाठी राबविलेल्या विविध लाभदायी योजनांमुळे  सर्वसामान्यांनाचे जीवनमान उंचविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा सेवा सप्ताह म्हणून सर्वत्र साजरा होत आहे. कोणत्याही प्रकारचा अनावश्यक खर्च न करतांना नागरिकांना उपयोगी होतील, असे उपक्रम यानिमित्त राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत राबविण्यात आलेला रक्तदानाच्या उपक्रम हा गरजवंतांना जीवनदान देणार ठरेल. सध्या कोरोनाच्या काळात इतरही आरोग्य सेवा सुरळीत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष महेश तवले यांनी केले.
   भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जनकल्याण रक्तपेढी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष महेश तवले यांनी रक्तदान करुन शुभारंभ केला. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, वसंत लोढा, अ‍ॅड.विवेक नाईक, तुषार पोटे, महेश नामदे, आशिष आनेचा, मृणाली, मुथा, राकेश भोकरे, सिद्धेश नाकाडे आदि उपस्थित होते.
     याप्रसंगी भैय्या गंधे म्हणाले, सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भावामुळे इतर आरोग्य सेवा प्रभावित झाल्या आहेत. त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर घेण्यात आले आहे. त्यास युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे एक सक्षम नेतृत्व असून, त्यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर आहे. या कोरोनाच्या संकट काळात प्रत्येकाने सामजिकतेचे भान ठेवून समाजकार्यात सहभागी झाले पाहिजे. युवा मोर्चाचे कार्यकर्तेही यात आपले बहुमोल योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
     या रक्तदान संकलनाचे कार्य जनकल्याण रक्तपेढीच्यावतीने करण्यात आले. सूत्रसंचालन आशिष आनेचा यांनी केले. याप्रसंगी वैभव झोटिंग, लक्ष्मीकांत तिवारी, यश शर्मा, डॉ. दर्शन करमाळकर, सुबोध रसाळ, अभिजित सोनवणे, मल्हार गंधे, हुजेफा शेख, आनंद निंबाळकर उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment