पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना शासनाने 50 लाखाची मदत करावी ः दत्ता गाडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 5, 2020

पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना शासनाने 50 लाखाची मदत करावी ः दत्ता गाडगे

 पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना

शासनाने 50 लाखाची मदत करावी ः दत्ता गाडगे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेरच्या वतीने टिव्ही9 चे पत्रकार स्व. पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने 50 लाखाची मदत करावी यासाठीचे लेखी निवेदन पारनेरचे तहसिलदारांना देण्यात आले.दि.4 सप्टेंबर रोजी दु.12 वाजता नायब तहसिलदार अविनाश रणदिवे यांना संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे यांचे नेतृत्वा खाली सर्व पत्रकारांचे उपस्थितीत निवेदन देण्यात आले.अहमदनगरचे रहीवाशी आणि पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचे 2 सप्टेंबरला पुणे येथे कोरोनामुळे पहाटे 5:30 ला दुर्दैवी निधन झाले.तसेच बिडचे पत्रकार संतोष भोसले,लातुरचे गंगाधर सोमवंशी, नंदुरबारचे जयप्रकाश  डिगराळे,या पत्रकारांचेही कोरोनामुळेच निधन झाले आहे.राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी पत्रकारांना 50 लाखाच्या विमाकवचाची घोषणा केली होती. तरी आता कोरोनामुळे निधन झालेल्या सर्व पत्रकारांच्या कुटुंबियांना  50 लाखाची मदत मिळावी आणि प्रत्येक कोव्हिडसेंटरला पत्रकारांसाठी बेड आरक्षित ठेवावी. अशा मागण्या या निवेदनामधे करण्यात आल्या आहेत.यावेळी बोलताना राज्य मराठी पत्रकारसंघाचे पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे म्हणाले,राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घोषणा केल्याप्रमाणे 50 लक्ष रुपयांची मदत कोरोनामुळे मृत पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना  द्यावी.प्रत्येकाला फक्त बातमी आणि स्वत:च्या जाहीरातीसाठी पत्रकार हवेत. पण पत्रकारांवर बेतल्यावर कुणीच मदतीला येत नाही.राज्य शासनाने याची दखल घेवुन कुटुंबियांना 50 लाखाची मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.यावेळी प्रास्ताविक करताना पत्रकार संघाचे संपर्क प्रमुख संजय मोरे यांनी पांडुरंगाच्या कुटुंबियांना मदतीची मागणी केली.यावेळी पत्रकार संघाचे मार्गदर्शक अरुणराव आंधळे, रामदास नरड उपाध्यक्ष विनोद गायकवाड, राम तांबे, पारनेर शहराध्यक्ष संतोष सोबले, सचिव बाबाजी वाघमारे, प्रसिध्दीप्रमुख श्रीनिवास शिंदे, संपर्कप्रमुख संजय मोरे, पत्रकार किरण थोरात, शुभम, मेहेर, संपत वैरागर, निलेश शेंडगे आदींसह पत्रकार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment