अमरधाम मधील दशक्रिया विधी बंद! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 11, 2020

अमरधाम मधील दशक्रिया विधी बंद!

 अमरधाम मधील दशक्रिया विधी बंद!

जिल्हा पुरोहित मंडळाचा निर्णय...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर येथील अमरधाम मध्ये होणार्‍या दशक्रिया विधी सोमवार दि. 14 पासून ते मंगळवार 29 सप्टेंबरपर्यंत पुरोहीत मंडळाकडून बंद करण्यात आले आहेत.
अमरधाम येथील कुठलेही धार्मिक विधी केले जाणार नाही, अशी माहिती जिल्हा पुरोहीत मंडळाचे अध्यक्ष श्री.किशोर जोशी यांनी दिली आहे.अंत्यविधी व दशक्रियाविधी साठी होणार्‍या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोना बाधित झाले आहेत. अनेक जण आजारी आहेत.यात एक दोन पुरोहितांचा मृत्यूही झाला आहे. तर काही पुरोहितांच्या मुलांचा मृत्यू झाला आहे. नागरिक मृत झालेला व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती पुरोहितांना देत नाहीत. तसेच त्यांचे नातेवाईक, मुले, विधी करणारे यजमान, कोरोना पॉझीटीव असल्याची माहिती लपवत आहेत. तर काहीजण विधीला फक्त आमची घरचीच माणसे असणार आहे असे सांगतात, परंतू प्रत्यक्षात 50 ते 70 लोक असतात.अनावश्यक गर्दी केली जाते. गर्दीतच विधी करण्याकरिता पुरोहीतांवर दबाव आणला जातो.सध्या दररोज कोरोनाचे जिल्ह्यात 750 ते 800 रुग्ण सापडत आहेत.अंदाजे रोज 18 ते 20 लोकांचा कोरोना आजाराने मृत्यू होत आहे. आदी बाबींचा विचार करून अहमदनगर जिल्हा पुरोहीत मंडळाने दि .14 ते 29 सप्टेंबरपर्यंत कोणतेही धार्मिक विधी अमरधाम मध्ये केले जाणार नाही, असा सर्वानुमते निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment