आ. लंके यांच्या साकारलेल्या कोविड आरोग्य मंदिराबाबत नाशिक विभागीय आयुक्तांनी केले कौतुक! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 12, 2020

आ. लंके यांच्या साकारलेल्या कोविड आरोग्य मंदिराबाबत नाशिक विभागीय आयुक्तांनी केले कौतुक!

 आ. लंके यांच्या साकारलेल्या कोविड आरोग्य मंदिराबाबत नाशिक विभागीय आयुक्तांनी केले कौतुक!


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेले मा शरदचंद्रजी पवार साहेब कोवीड केअर सेंटरला शुक्रवारी नाशिक विभागीय मुख्य आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे यांची शुक्रवारी मा. शरदचंद्रजी पवार  कोवीड केअर सेंटरला भेट देत प्रशासकीय यंत्रणा आरोग्य विभाग व केअर सेंटर व्यवस्थापन समितीची आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोविड सेंटर मध्ये होत असलेल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले.
रुग्णांना वेळोवेळी देण्यात येत असणार्‍या विविध सेवा बाबत पाहणी केली व रुग्णांची देखील त्यांनी विचारपूस केली यावेळी  उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले  पारनेरच्या तहसीलदार सौ.ज्योती देवरे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश लाळगे यांनी श्री गमे यांचे स्वागत केले व तेथील सर्व पार्श्वभूमी मुख्य विभाग आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.  यावेळी मा. राज्यमंत्री अशोकराव सावंत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबाजीशेठ तरटे, प्रतिष्ठानचे प्रांत उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी, सुवर्णाताई धाडगे, नगरसेवक नंदकुमार देशमुख, किसनदादा गंधाडे, अंकुश पायमोडे डॉक्टर सचिन आहेर पत्रकार शरद झावरे, श्रीकांत चौरे, संभाजी वाळुंज, डॉक्टर बर्वे, सुनील मुळे, दत्ता निवडूंगे यांच्यासह निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारी मित्र, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त नाशिक विभागचे राधाकृष्ण गमे यांनी पारनेर तालुक्यातील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरास पाहणी करत तेथील सर्व रुग्णांना मिळत असलेल्या सेवे बाबत व आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या कोवीड केअर सेंटर बद्दल समाधान व्यक्त केले तसेच तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला व त्या बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासनाने चांगल्या पद्धतीने उपयोजन केल्या असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले तालुक्यात प्रशासनाला राजकीय पातळीवर देखील चांगले योगदान व मदत मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment