30 बेडचे ऑक्सिजनयुक्त न्यू लाईफ कोविड केअर सेंटरचे उद्घाटन.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 10, 2020

30 बेडचे ऑक्सिजनयुक्त न्यू लाईफ कोविड केअर सेंटरचे उद्घाटन..

 30 बेडचे ऑक्सिजनयुक्त न्यू लाईफ कोविड केअर सेंटरचे उद्घाटन..

सकारात्मक दृष्टीकोनातून आरोग्यसेवा द्यावी! 

: ह.भ.प.उद्धवमहाराज मंडलिक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागरिकांवर या विषाणूचे मोठे संकट आल्यामुळे भयभीत झाला आहे. नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देऊन आधार देण्याचे काम हॉटेल पुष्कराजमधील न्यू लाईफ कोविड केअर सेंटरने करावी. शहरातील तरुण डॉक्टर एकत्र येऊन 30 बेडचे ऑक्सिजन कोविड सेंटर सुरु करत आहेत. आताच्या काळात ऑक्सिजनची अत्यंत गरज भासत आहे. या डॉक्टरांनी सकारात्मक दृष्टीकोनातून आरोग्यसेवा करावी. रुग्ण बरे व्हावे व कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, अशी ईश्वचरणी प्रार्थना करतो, असे प्रतिपादन ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.
मनमाड रोडवरील हॉटेल पुष्कराजमध्ये न्यू लाईफ कोविड केअर रुग्णालयाचे उद्घाटन ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. संग्राम जगताप, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेष कुमारसिंग, आयुक्त श्रीकांत मायकलवार, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, संपत नलवडे, दंततज्ज्ञ डॉ. सुमित नलवडे, डॉ. वैभव शेटे, डॉ. अनिकेत गणे, डॉ. ईश्वर कणसे, डॉ. संतोष पालवे, डॉ. भारत साळवे, डॉ. अमोल जाधव,विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, दत्ता गाडळकर, प्रसाद ढोकरीकर, श्रीनिवास बोज़ा, जयंत येलूलकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री कर्डिले म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शहरात न्यू लाईफ कोविड सेंटरने 30 बेडचे आयसीयू हॉस्पिटलला सुरुवात केली. नगर जिल्हा हा विस्ताराने मोठा आहे. आज खरे कोरोना रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर मिळत नाही. त्यामुळे शहरातील तज्ज्ञ डॉक्टर अनुभवी डॉक्टरांना सोबत घेऊन हे रुग्णालय सुरु केले. शहरातील तरुण डॉक्टर पुढे येऊन सेवा देण्याचे काम करत आहेत. प्रत्येक नागरिकांनी नियमांचे पालन करुन कोरोना आजार होऊच नये याची काळजी घ्यावी, असे ते म्हणाले. आ.संग्राम जगताप यावेळी म्हणाले की, नगर शहरामध्ये केअर सेंटर मोठ्या प्रमाणात आहे. परंतु अत्याधुनिक सुविधा तसेच ऑक्सिजनची गरज असणारे हॉस्पिटलची कमतरता कोरोना रुग्णांना भासत आहे. या पार्श्वभूमीवर नगर शहरातील विविध तज्ज्ञ डॉक्टर एकत्र येऊन न्यू लाईफ कोविड केअर सेंटर सुरु केले. हे सेंटर 300 बेडचे असल्यामुळे कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे ते म्हणाले. डॉ. सुमित नलवडे म्हणाले की, आम्ही सर्व डॉक्टर सामाजिक भावनेतून एकत्र येऊन न्यू लाईफ कोविड केअर सेंटर हे 30 बेडचे आयसीयूचे रुग्णालय सुरू करत आहे. यामध्ये एम.बी.बी.एस., एम.डी.मेडीसीन डॉ. ईश्वर कणसे गेली पाच महिने कोविड फिजिशियन म्हणून काम करत आहेत. कोविड रुग्णांसाठी दक्षता टीम तयार करण्यात आली आहे. 24 तास डॉक्टर, आयसीयू, ऑक्सिनज, बेड व व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध केली आहे. यामध्ये डॉ. ईश्वर कणसे, डॉ. आशिष चौधरी, डॉ. संतोष पालवे, डॉ. भरत साळवे हे तज्ज्ञपथक कोविड रुग्णांवर उपचार करतील. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हा पोलिस अखिलेष कुमारसिंग, आयुक्त श्रीकांत मायकलवार व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शुभेच्छा दिल्या.


No comments:

Post a Comment