कंगनाने महाराष्ट्राचा अपमान केला-दिलीप सातपुते. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 10, 2020

कंगनाने महाराष्ट्राचा अपमान केला-दिलीप सातपुते.

 कंगनाने महाराष्ट्राचा अपमान केला-दिलीप सातपुते.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत हिने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करून महाराष्ट्राचा अपमान केला असून वादग्रस्त वक्तव्याबाबत कंगना राणावतवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केली आहे.
चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतने  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने राज्यातील जनतेच्या भावना दुखविल्याच्या निषेधार्थ नगर येथे शिवसेनेच्यावतीने नेता सुभाष चौक येथे तिच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारुन दहन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, उपजिल्हा उपप्रमुख गिरिष जाधव, नगरसेवक योगिराज गाडे, अमोल येवले, विजय पठारे, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, शशिकांत देशमुख, बाबू कावरे, संग्राम कोतकर, अभिषेक भोसले, अक्षय कातोरे, विशाल गायकवाड आदिंसह शिवसैनिक उपस्थित होेते. याप्रसंगी दिलीप सातपुते म्हणाले, आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, ज्या राज्यात आपले कमवतो, त्या राज्याच्या विरोधात  भुमिका म्हणजे एकप्रकारे देशद्रोहच आहे. महाराष्ट्राने आपणाला नाव दिले, पैसे दिले तरीही तेथील पोलिस, मुख्यमंत्री यांच्यावतीने बेताल व्यक्तव्य करुन एकप्रकारे संपूर्ण महाराष्ट्र जनतेचा अपमान केला आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, कंगणाच्या वक्तव्यांचा आम्ही शिवसैनिक तिव्र निषेध करतो व तातडीने कंगणावर गुन्हा नोंदवून कडक कारवाई करावी, अशी मागणी आहे. याप्रसंगी बाळासाहेब बोराटे यांनी कंगणा राणावात हीने नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. तिचे मानसिक संतुलन बिघडलेले असून, अशा व्यक्तीला महाराष्ट्रात स्थान नाही, हे पार्सल परत पाठवून दिले पाहिजे. तिच्या सर्व कार्यक्रम व चित्रपटांवर बहिष्कार घालावा, अशा तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी कंगणा राणावत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व वादग्रस्त व्यक्तव्यांबद्दल गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

No comments:

Post a Comment