सभापती कोणाचा? ‘महाविकास’ आघाडी धर्म पाळणार का? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 10, 2020

सभापती कोणाचा? ‘महाविकास’ आघाडी धर्म पाळणार का?

 सभापती कोणाचा? ‘महाविकास’ आघाडी धर्म पाळणार का?

स्थायी समितीच्या ‘सभापती’ निवडणुकीच्या हलचाली सुरु! राष्ट्रवादीच्या भुमिकेकडे शिवसेनेचे लक्ष


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मनपा स्थायी समिती सभापती निवडणुकीचा आदेश राज्याचे नगरविकास खात्याचे अप्पर सचिव सहस्त्रबुद्धे यांनी इमेलद्वारे मनपा आयुक्तांना दिले असून ही सभा केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सद्वाराच घेण्याची सूचना केली आहे.
नगरविकास खात्याचा आदेश आल्यापासून सभापतीपदाच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या बसपाचे मुदस्सर शेख, भाजपा व राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सभापती पदावर आहेत. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाची आघाडी सत्तेवर आहे. पण ही आघाडी महापालिकेत सरकार स्थापन होऊन वर्ष पूर्ण होऊनही मनपामध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात येऊ शकली नाही. ही आघाडी मनपात व्हावी यासाठी राज्यातील नेते प्रयत्न करीत आहेत. स्थायी समितीचा सभापती कोणाचा? महाविकास आघाडी आघाडीधर्म पाळणार का? याची चर्चा सध्या नगर शहरात व पालिका वर्तुळात सुरू आहे.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण व कंगना राणावत प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तप्त आहे. प्रमुख विरोधी पक्ष भाजपा या दोन्ही मुद्यावरून आघाडी सरकारच्या विरोधात रान उठवत असताना शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांना एकत्र येऊन सभापतीपदावर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून द्यावा अशी अपेक्षा शिवसैनिक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नेतृत्वाने या प्रश्नात लक्ष घातले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सभापती पदाची निवडणूक जिंकण्यासाठी 9 सदस्यांची आवश्यकता आहे. शिवसेनेचे 5 व राष्ट्रवादीचे 5 अशी महाविकास आघाडी झाली तरी महाविकास आघाडीचा सभापतीपदी होऊ शकणार आहे.
सध्या शिवसेना 5 भाजपा 4 राष्ट्रवादी 5 काँग्रेस 1 बसपा 1 असे स्थायी समितीत बलाबल आहे. शिवसेना वगळता सर्व स्थायी सदस्य एकत्र असल्यामुळे भाजप व राष्ट्रवादी सभापतीपदाचे प्रमुख दावेदार आहे. शिवसेनेला सभापती पद मिळवायचे असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. त्यादृष्टीने चर्चा सुरू आहे पण राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस नेतृत्वाने लक्ष घातले तरच हे सहज होऊ शकणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे महानगरपालिका स्थायी समिती सदस्य निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.कालावधी संपत असलेल्या सदस्यांचा पदावधी पुढील शासन आदेशापर्यंत चालू ठेवण्यास व सभांबाबतचा निर्णय त्यांच्या स्तरावर करण्यास कळविण्यात आले होते.तसेच सर्व नागरिक स्थानिक तरतुदीनुसार रिक्त पद विहित पद्धतीने भरणं आवश्यक असल्याने महानगरपालिकेमधील स्थायी विषय समिती पदाधिकार्‍यांची पद रिक्त झाल्यास अंतर्गत निवडणुकीद्वारे भरणे आवश्यक आहे.महानगरपालिकेमधील स्थायी विषय समिती पदाधिकार्‍यांची पद रिक्त झाल्यास अंतर्गत निवडणुकीद्वारे भरण्यात यावे.सदर निवडणुकांसाठी आयोजित करावयाची सभा केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात यावी.सदर पद्धतीने अंतर्गत निवडणुका घेताना निवडणुकीबाबत चे सर्व बाबी अभिलेख विहित पद्धतीने अभिलिखीत व जतन करण्यात याव्यात अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment