उद्या कोव्हीड सेंटरचे उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 4, 2020

उद्या कोव्हीड सेंटरचे उद्घाटन

 उद्या कोव्हीड सेंटरचे उद्घाटन

कोविड लढाईसाठी नगर भाजपा सज्ज

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहरात व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढला आहे, सरकारी यंत्रणेवर ताण पडल्यामुळे कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होणे मुश्कील झाले आहे, गोरगरीब रुग्णांना पैशाअभावी योग्य व प्रभावी ट्रीटमेंट मिळणे मुश्कील झाले आहे, त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहर भाजपा अहमदनगर महानगरपालिका व पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण मोफत कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात येत असुन उद्या दि. 5 सप्टेंबर रोजी हॉटेल नटराज येथे पश्चिम महाराष्ट्र प्रांतसंघचालक नानासाहेब जाधव यांचे शुभहस्ते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन नगर भाजपा जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे, पंडित दीनदयाळ नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन वसंत लोढा यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment