शिवसैनिकांना मतभेद, गटतट संपविण्याचे ना.शंकरराव गडाख यांचे आवाहन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 4, 2020

शिवसैनिकांना मतभेद, गटतट संपविण्याचे ना.शंकरराव गडाख यांचे आवाहन

 शिवसैनिकांना मतभेद, गटतट संपविण्याचे ना.शंकरराव गडाख यांचे आवाहन

अनिलभैय्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी लक्ष घालणार !

जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्याचा निर्धार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्व.अनिल भैय्या राठोड व शिवसैनिकांनी अखंड परिश्रम घेऊन शिवसेना वाढविली. त्या अनिलभैय्या राठोडांचं स्वप्न साकार करण्यासाठी मी आता नगर  शहरात व जिल्ह्यात लक्ष घालणार असून ,शिवसैनिकांनीं सर्व मतभेद गटतट विसरून एकोप्याने शिवसेना नगर जिल्ह्यात कशी भक्कम राहील याचा प्रयत्न करावा असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले. जिल्ह्यातील कोरोना स्थिती, शिवसेना पदाधिकारी यांच्याशी सुसंवाद व जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्यावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

श्री गडाख पुढे म्हणाले की, राज्यात महाविकासआघाडी सरकार सत्तेवर आहे. या सत्तेच्या माध्यमातून आपणास जिल्ह्यातील प्रश्न सोडवायचे आहेत. मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला नगर जिल्ह्यात जास्त लक्ष घालण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रश्नांची आपणास सोडवणूक करावयाची आहे. शहरातील, जिल्ह्यातील कोणताही प्रश्न असो तो सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगर शहरातील वार्डच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून अनिल भैय्या राठोड यांची उणीव जाणू देणार नाही असे सांगून गडाख पुढे म्हणाले की, शिवसेना पक्ष हा कष्टकरी, शेतकरी ,गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या विचार धारणेशीे माझे विचार जुळत असल्यामुळे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रति असलेली निष्ठा व विश्वासामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला व आता शिवसैनिक झालो आहे. शिवसेना नगर जिल्ह्यात वाढविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. असेही ते म्हटले.
नगर शहरातील जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका, कोरोना उपचारासंदर्भातील परिस्थिती, महानगरपालिकेतील राष्ट्रवादी- भाजपा युती, शिवसेना नगरसेवकांना येत असलेल्या अडचणीही गडाख यांनी याप्रसंगी समजून घेऊन चर्चा केली. याप्रसंगी माजी आमदार विजय औटी, शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, नगर जिल्हा शिवसेना प्रमुख शशिकांत गाडे,  संभाजी कदम, शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते,उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, अभिषेक कळमकर, यांच्यासह नगरसेवक बाळासाहेब बोराटे, श्याम नळकांडे, संजय शेंडगे, योगीराज गाडे, अनिल शिंदे, संतोष गेनाप्पा, सचिन शिंदे, मदन आढाव, गणेश कवडे, विजय पठारे, प्रशांत गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment