आज 170 पॉझिटीव्ह - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 4, 2020

आज 170 पॉझिटीव्ह

 आज  170 पॉझिटीव्ह

549 रुग्णांना डिस्चार्ज

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यात आज तब्बल 549 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 20 हजार 510 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 87.25 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी 12 वाजेपर्यंतरूग्ण संख्येत 170 ने वाढ झाली.यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 2657 इतकी झाली आहे. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 113, संगमनेर 02, पाथर्डी 04, नगर ग्रामीण 12, श्रीरामपूर 01, कँटोन्मेंट 03, श्रीगोंदा 11, पारनेर 03, शेवगाव 13, कोपरगाव 06, इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज 549 रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला.यामध्ये, मनपा 239 संगमनेर 36, राहाता 28, पाथर्डी 14, नगर ग्रा.15, श्रीरामपूर 39, नेवासा 29, श्रीगोंदा 13, पारनेर 15, अकोले 08, राहुरी 16, शेवगाव 20,  कोपरगाव 34, जामखेड 15 कर्जत 15, मिलिटरी हॉस्पिटल 13 अशा रुग्णांचा समावेश आहे. बरे झालेली रुग्ण संख्या: 20510 उपचार सुरू असलेले रूग्ण:2657 मृत्यू: 339* एकूण रूग्ण संख्या:23506


No comments:

Post a Comment