पालिकेने गणपती विसर्जनासाठी नागरिकांना अमोनियम बायकार्बोनेट पावडर विनामूल्य उपलब्ध करावे ः बोज्जा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 25, 2020

पालिकेने गणपती विसर्जनासाठी नागरिकांना अमोनियम बायकार्बोनेट पावडर विनामूल्य उपलब्ध करावे ः बोज्जा

 पालिकेने गणपती विसर्जनासाठी नागरिकांना अमोनियम बायकार्बोनेट पावडर विनामूल्य उपलब्ध करावे ः बोज्जा


नगरी दवंडी /प्रिंतनिधी
अहमदनगर ः यंदाचे गणेश विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी घरा बाहेर न पडता घरातच विसर्जन करावे त्या साठी अहमदनगर महानगरपालिकेने नागरिकांना अमोनियम  बायकार्बोनेट पावडर विनामूल्य उपलब्ध करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी आयुक्त, महानगरपालिका व महापौर यांना मेल द्वारे केले आहे.
सध्या कोरोना विषाणूने अहमदनगर शहारामध्ये थैमान घातले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.अश्या परस्थिती मध्ये गणपती विसर्जना निमित्त नागरिकांनी बाहेर पडू नये याची काळ्जी महानगरपालिकेने घेणे महत्वाचे आहे.  जर नागरिक विसर्जन करिता बाहेर पडले तर सोशल  डिस्टनसिंगचा फज्जा उडेल व यामुळे विषाणू फोफावल्या शिवाय राहणार नाही.  या करिता नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर न पडता गणेश विसर्जन आपल्या घरातच करावे, त्यासाठी महानगरपालिकेने अमोनियम  बायकार्बोनेट पावडरची व्यवस्था केल्यास मूर्ती विसर्जन केल्या नंतर प्रदूषण होणार नाही व मूर्ती चे लवकर विसर्जन होईल.  
नुकतेच पुणे महानगरपालिकेने कोरोना विषाणू चे गांभीर्य लक्षात घेऊन सोशल  डिस्टनसिंग  होणे कमी नागरिकांना विनामूल्य अमोनियम  बायकार्बोनेट पावडरची व्यवस्था केली आहे.
या करिता या गणेशोत्सकाळामध्ये सध्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून गणेश मूर्ती घरातच विसर्जन करावे व यासाठी अहमदनगर महानगरपालिकेने नागरिकांना विनामूल्य अमोनियम  बायकार्बोनेट पावडर ची व्यवस्था करावी तसेच प्रत्येक वार्ड मध्ये निर्माल्य संकलन करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करावी असे आवाहन  सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केले.

No comments:

Post a Comment