पतसंस्थाच ग्रामीण भागाच्या अर्थवाहीन्या ः आ.लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 25, 2020

पतसंस्थाच ग्रामीण भागाच्या अर्थवाहीन्या ः आ.लंके

 पतसंस्थाच ग्रामीण भागाच्या अर्थवाहीन्या ः आ.लंके

मळगंगा नागरी पतसंस्था व त्या नंतर निघोज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री बाबासाहेब भागुजी कवाद यांच्या मार्गदर्शना खाली 22 वर्ष शेतकरी, ग्राहक,सभासद, खातेदारासाठी प्रामाणिक पणे सेवा करून त्यांची अर्थिक उन्नती,जिवनमान उंचविण्यांसाठी नेहमी प्रयत्न केले,त्यामुळे सहकारात काम करण्यांचा प्रदिर्घ असा अनुभव घेऊनच विध्नहर्ता सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातुन ग्रामिण भागातील व्यवसायिक,शेतकरी यांना पतपुरवठा करून त्यांच्या अर्थिक विकासास निश्चितच हातभार लावण्यांचा प्रयत्न करणांर असल्यांचे सांगितले. छोटया-मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ देण्यांयाचे ग्राहक उपयोगी कार्य करणार आहे.
- सुभाष साठे,अध्यक्ष, विघ्नहर्ता ग्रामिण पतसंस्था


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः ग्रामिण भागातिल अर्थव्यवस्थेला स्पर्धेत युगात चालना देण्यांसाठी या भागातिल गरजू व सामान्य लघू व मध्यम व्यवसायातिल तरुणांना अर्थिक मदत करून त्यांच्या उद्योग-व्यवसायास उभारी देण्यांचे काम विघ्नहर्ता ग्रामिण पतसंस्था निश्चितच करणांर असुन त्यामुळे अनेक कुटूंबे अर्थिकदृष्ट्या समृद्ध होवून ग्रामिण भागाचा कायापालट होणांर असल्यांचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.
निघोज(ता.पारनेर)येथिल विघ्नहर्ता ग्रामिण पतसंस्थेच्या नुतन शाखेच्या  उद्घघाटन प्रसंगी आमदार निलेश लंके बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष सुभाष साठे,उपाध्यक्ष भाऊसाहेब मदगे,संचालक साहेबराव हिंगे यांनी सर्वांचे स्वागत केले.   यावेळी बोलतांना आमदार लंके म्हणांलेविघ्नहर्ता ग्रामिण पतसंस्था आपल्या पारदर्शी कारभाराच्या जोरावर निश्चित अल्पावधिच मोठी प्रगती करेल, राज्यात नगर जिल्हा हा सहकारात अग्रेसर असलेला जिल्हा असुन पतसंस्थाचे जाळे असलेला जिल्हा आहे.
सध्याचा काळ हा कोराना महामारीचा असला तरी विघ्नहर्ता ग्रामिण पतसंस्था ग्रामिणअर्थकारणाला मदत करून उद्याच्या काळात दमदार वाटचाल करील,शेतकरी,सर्व सामान्यांची आर्थिक पत सांभाळण्यांसाठी व शेती पुरक व्यवसायांना कर्ज देण्यांचे संस्थेचे धोरण ग्रामिण अर्थव्यवस्थेस बळकटी देणांरे आहे. संस्थेचे अध्यक्ष सुभाष साठे यांनी बोलतांना सांगितले की पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामिण भागातील व्यवसायिक,शेतकरी यांना पतपुरवठा करून त्यांच्या अर्थिक विकासास निश्चितच हातभार लावण्यांचा प्रयत्न करणांर असल्यांचे सांगितले.
यावेळी सरपंच ठकाराम लंके,मळगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कवाद,राष्ट्रवादिचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे,माजी सभापती सुदाम पवार,शिरूर महानगर पालिकेचे नगरसेवक विठ्ठल पवार,पोपट कुंरदळे,पुणे येथिल उद्योजक मिंढे साहेब,प्रसिद्ध कांदा व्यापारी भिमाशेठ घुले,महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमण सोपानशेठ भाकरे,मळगंगा ट्रस्टचे कोषाध्याक्ष ज्ञानदेव लंके,सेवा सोसायटीचे बाळासाहेब लामखडे,पांडूरंग कृपा पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लंके,सोमनाथ वरखडे,बबन तनपुरे, विघ्नहर्ता पतसंस्थंचे संचालक अशोक कर्डीले, गजाबा कर्‍हे,अशोक कारखिले,भाऊसाहेब गाडेकर, दादाभाऊ गायकवाड,सौ कल्पना खोडदे,सौ निर्मला गाडीलकर तसेच परिसरीत सर्व गावचे सरपंच,उपरपंच,विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष साठे,उपाध्यक्ष भाऊसाहेब मदगे यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला.तज्ञ संचालक संतोष कळसकर,व सुशांत साठे यांनी सुत्रसंचालन केले,संस्थेचे कर्मचारी नवनाथ बेलोटे, अरविंद बेलोटे,सागर कर्डीले यांनी उपस्थिताचे स्वागत केले.शाखा व्यवस्थापक बबनराव बेलोटे साहेब यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment