अमरधाम येथील अंत्यविधी बंद करा ः नालेगाव ग्रामस्थ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 25, 2020

अमरधाम येथील अंत्यविधी बंद करा ः नालेगाव ग्रामस्थ

 अमरधाम येथील अंत्यविधी बंद करा ः नालेगाव ग्रामस्थ

अन्यथा गेट बंद आंदोलनाचा इशारा


नगरी दवंडी /प्रिंतनिधी
अहमदनगर ः सध्या अहमदनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे . यामुळे रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण ही वाढले आहे . नालेगांव अमरधाम क्षेत्रफळ पाहता ते अपुरे पडत आहे . तसेच नालेगांव अमरधाम येथे संपूर्ण जिल्ह्यातील अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याने मोठ्याप्रमाणात धुराचे लोट नालेगांव गावठाण , सुडके मळा , बागरोजा हाडको , दिल्लीगेट , पटवर्धन चौक , कल्याण रोड परिसर , ठाणगे मळा इत्यादी परिसरात पसरत आहे . या सध्याच्या वातावरण व कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता या सर्व परिसरातील नागरिकांच्या मनात भितीची भावना निर्माण झाली आहे .  त्यामुळे, नालेगांव अमरधाम येथे नगर शहरातील अंत्यविधी करण्यात यावी अन्यथा अंत्यविधी बंद करण्याबाबत निर्णय घ्यावा , अन्यथा परिसरातील नागरिकांसमवेत अमरधाम येथे गेटबंद आंदोलन करण्यात येईल , असा इशारा वैभव वाघ व नालेगाव भागातील नागरिकांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना निवेदन दिले आहे. पूर्वी नालेगांव अमरधाम हे नगर शहराच्या हद्दीवर व नदी किनारी येते असल्यामुळे त्याबाबत कुणाचीही तक्रार नव्हती, पण सद्यस्थितीत भौगोलिक दृष्ट्या नगरच्या वाढत्या नागरिकरणाच्या दृष्टीने मध्यवर्ती भागात आले आहे . तसेच साधारणपणे मार्च महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांचे अंत्यसंस्कार होण्यास सुरूवात झाली. कोरोनाचा प्रसार पाहता या धुरामुळे आमच्या व वरील नमूद सर्व परिसरात प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे . तसेच अमरधाम येथील धुराचा त्रास गेल्या अनेक वर्षापासून परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे . त्यामुळे आपणास विनंती करण्यात येते की, अमरधाम या संकल्पणेनुसार अंत्यविधीसाठी नागरीवस्ती पासून लांब अंत्यसंस्कारासाठी सोय करावी व नालेगांव अमरधाम येथे अंत्यविधी बंद करण्याबाबत निर्णय घ्यावा , अन्यथा परिसरातील नागरिकांसमवेत अमरधाम येथे गेटबंद आंदोलन करण्यात येईल . तसेच या परिसरात धुराच्या त्रासामुळे नागरिकांच्या जीवीतास हानी झाल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल . याची नोंद घ्यावी, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनावर  नगरसेवक गणेश कवडे, नगरसेवक भाऊ बोरुडे, नगरसेवक अजय चितळे,  गजेंद्र दांगट, विकी वाघ आदींच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment