स्थायी समितीची ऑनलाइन सभा संपन्न! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 7, 2020

स्थायी समितीची ऑनलाइन सभा संपन्न!

 स्थायी समितीची ऑनलाइन सभा संपन्न!

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः नगर महापालिकेच्या स्थायी समितीची ऑनलाइन सभा सभापती मुदस्सर शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. स्थायी समितीच्या 16 सदस्यांनी या सभेत सहभाग घेतला. सभेपुढे आलेले सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

सभेच्या सुरुवातीला शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गणेश भोसले, विजू पठारे, शाम नळकांडे, कुमार वाकळे, योगीराज गाडे या समिती सदस्यांनी राठोड यांना श्रद्धांजली वाहताना राठोड यांच्या कार्याचा गौरव केला व ऑनलाईन सभेस सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगोरोत्थान अभियान अंतर्गत प्रभाग क्र. 6 मधील भिडे हॉस्पिटल ऑक्सी लियम शाळेपर्यंत काँक्रिटीकरण करणे प्रभाग क्र. 11 प्रभाग क्रं.6व 7, प्रभाग क्रं.14 मध्ये मजबुतीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण, खडीकरण मंजुरी, नगरी दलिततेर वस्ती 2019-2020 अंतर्गत प्रभाग क्रं.11,14,9 मध्ये आर.सी.सी. पाईप गटार रस्ता काँक्रिटीकरण मध्ये पावसाळी गटार, डांबरीकरण, मजबुतीकरण, सिमेंट काँक्रिटीकरण मंजूर करणे हे विषय मंजूर करण्यात आले. याप्रसंगी उपायुक्त पठारे, शहर अभियंता सुरेश इथापे व मनपातील पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment