मातृस्नेह प्रतिष्ठानच्यावतीने पै.स्वप्निल आडसुळ यांच्या वाढदिवसानिमित्त होमिओपॅथी औषध वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 7, 2020

मातृस्नेह प्रतिष्ठानच्यावतीने पै.स्वप्निल आडसुळ यांच्या वाढदिवसानिमित्त होमिओपॅथी औषध वाटप

 मातृस्नेह प्रतिष्ठानच्यावतीने पै.स्वप्निल आडसुळ यांच्या वाढदिवसानिमित्त होमिओपॅथी औषध वाटप

संसर्ग टाळा अन् स्वतःचे व समाजाचे कोरोनापासून  रक्षण करा ः डॉ.पुंड

नगरी दवंडी /प्रिंतनिधी
अहमदनगर ः सामाजिक भान ठेवून जबाबदारीने वागल्यास व प्रशासनाच्या आदेशांचे पालन केल्यास आपण नक्कीच कोरोनावर विजय मिळवू शकतो. नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळावी, मास्कचा योग्य पद्धतीने वापर करावा, सामाजिक अंतर राखावे, विनाकरण घराबाहेर पडू नये, स्वच्छता पाळावी, सकस व परिपूर्ण आहार घ्यावा. मातृस्नेह प्रतिष्ठानच्यावतीने कोरोना विषयी जागृती करुन होमिओपॅथी औषध वाटपचा उपक्रम कौतुकास्पद असाच आहे. अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये जागृती होऊन कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन डॉ. संजय पुंड यांनी केले.
मातृस्नेह प्रतिष्ठानच्यावतीने बागडेमळा येथे पै.स्वप्निल आडसुळ यांच्या वाढदिवसानिमित्त मुंजोबा गणेश मंडळाच्या सहकार्याने परिसरातील नागरिकांना होमिओपॅथी औषधाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.सुरेखाताई लकशेट्टी, रविंद्र लकशेट्टी, श्रुती लकशेट्टी, श्रीनिवास बुरगुल आदि उपस्थित होते.
याप्रसंगी स्वप्निल आडसुळ म्हणाले, नागरिकांनी स्वत:ची व इतरांची काळजी घ्यावी. एकत्रित प्रयत्नातून आपण नक्कीच यशस्वी होऊ. आज प्रत्येकाने एकमेकांना मदत करण्याची गरज आहे. आपल्या आनंदी क्षणी इतरांनाही सामाजिक उपक्रमाद्वारे सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रसंगी अध्यक्षा सौ.सुरेखाताई लकशेट्टी म्हणाल्या, अर्सेनिक अल्बम हे होमिओपॅथी औषध आयुष मंत्रालयाने सुचविले असून, या औषधाने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढेल. नागरिकांनी ही औषधे घ्यावी व पथ्यही पाळावीत. प्रशासन, व नागरिकांनी एकत्रितपणे कोरोनाविरुद्ध लढायचे ठरविल्यास आपण यशस्वी व कोरोनामुक्त होऊ शकतो. मातृस्नेह प्रतिष्ठानने यापूर्वी वंचित व गरजूंना धान्य वाटप केले. आताही विविध भागात औषध वाटप करीत आहोत. नागरिकांना याचा चांगला लाभ होईल. स्वप्निल आडसुळ यांनी वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी राबविलेला उपक्रम अनुकरणीय असाच आहे, असे सांगितले.
यावेळी स्वप्निल आडसुळ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. मातृस्नेह प्रतिष्ठानच्यावतीने मोफत देण्यात आलेल्या औषधाचे परिसरातील नागरिकांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी सतीष भांबरकर, समीर जहागिरदार, गोरख वाघ, राजु म्हस्के, दिपक बेद्रे, सागर भांबरकर, रमेश होंडे, मयुर राऊत, भाऊ साठे, सोमनाथ कोकणे, रवि  कापसे, राजेंद्र भांबरकर, मंगेश पुंड, रजत चव्हाण, सुभाष होंडे, भैय्या होंडे आदि उपस्थित होते. औषध वाटपासाठी मुंजोबा मंडळाच्या कार्यकर्ते यांनी विशेष परीश्रम घेतले सोशल डिस्टेंन्सिंग, सॅनिटायझरचा यावेळी उपयोग करण्यात आला. सूत्रसंचालन सागर भांबरकर, आभार रमेश होंडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment